Agriculture Department : कृषी विभागाकडून पेरणी क्षेत्राची आकडेवारी आली समोर

Maharashtra Krushi Vibhag : राज्यात सध्या २०.६० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
Farming
FarmingAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्रात जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने अनेक जिल्ह्यात पेरण्या लांबणीवर गेल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यात अद्यापही बऱ्याच जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाल्या नसल्याने ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. दरम्यान राज्याच्या कृषी विभागाने किती हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत याची माहिती सादर केली आहे.

राज्यात सध्या २०.६० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान ज्या भागात पेरण्या होतील त्यानुसार पेरणीचे क्षेत्र वाढणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

याचबरोबर भविष्याच महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट येऊ नये म्हणून दुष्काळ निवारण सज्जता, खरीपाची कामे आणि केंद्र सरकारच्या कृषी विभागातील नवीन योजनांची आढावा बैठक घेण्यात आली.

दरम्यान या बैठकीत राज्यात झालेल्या पाऊस तसेच सध्या झालेल्या पेरण्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. जून महिन्यापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३९ टक्के पावसाचे प्रमाण कमी आहे. परंतु हवामान खात्याच्या माहितीनुसार जुलै महिन्यात महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची शक्यता वर्तवली.

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण व्यवस्था, खरीपाच्या पेरण्यांची प्रगती आणि इतर कामांचा आढावा घेण्यासाथी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण (विस्तार) विभागाचे सहसचिव, सॅम्युअल प्रवीण आणि महाराष्ट्रातील कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या सह-अध्यक्षतेखाली, पुण्यात बैठक झाली.

सोयाबीन आणि कापसा पाठोपाठ, कडधान्ये आणि धान ही राज्यातील प्रमुख खरीप पिके आहेत. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत, महाराष्ट्र राज्याने 'थेंबा थेंबात अधिक शेती' योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

2022-23 या वर्षात, या योजने अंतर्गत १ लाख २७ हजार ६२७ पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. याचबरोबर १ लाख १२ हजार हेक्टरवरी जमीन सिंचनाखाली आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

यावेळी हवामान विभागाने मान्सूनबाबत माहिती देताना सांगितले की, जुलै महिन्यात, राज्यात उच्चांकी पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

परंतु मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची समाधानकारक कामगिरी नसल्याचे सांगण्यात आले. येत्या दोन आठवड्यात, राज्यात सगळीकडे, सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊसमान असेल असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com