Loan Recovery Agrowon
ताज्या बातम्या

Loan Recovery : नगर जिल्ह्यातील बॅंकांनी कर्जवसुली थांबवावी

Latest Agriculture News : नगर जिल्ह्यात पावसाचे सरासरी पर्जन्यमान ८०० मिलिमीटर असते. आतापर्यंत नगर जिल्‍ह्यात सरासरी केवळ २०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरी अवघा २२४ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर केला पाहिजे.

शिवाय बॅंकांकडून सुरू असलेली कर्जवसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना भेटून कर्जवसुली थांबवण्याबाबत विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल औताडे म्हणाले, ‘‘नगर जिल्ह्यात पावसाचे सरासरी पर्जन्यमान ८०० मिलिमीटर असते. आतापर्यंत नगर जिल्‍ह्यात सरासरी केवळ २०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. बहुतांश पिके वाया गेली आहेत. जिल्हा प्रशासनानेच तसा अहवाल दिला आहे. असे असताना अजून दुष्काळ जाहीर केला नाही. नगर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा. खरिपातील जवळपास सर्वच पिके वाया गेली आहेत.

अनेक भागात वीजपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे, याची प्रशासनाला जाणीव असतानाही शेतकऱ्यांकडून अत्यंत वाईट पद्धतीने कर्जाची वसुली केली जात आहे. जिल्ह्यातील शेतीला वित्तीय पुरवठा करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँकेअंतर्गत सेवा सोसायट्यांकडून सक्तीचे वसुली धोरण, न्यायालयीन कारवाया, जमीन जप्तीच्या १०१च्या नोटिसा अशा पद्धतीने दुष्काळी परिस्थितीत कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे.

तसेच महिंद्रा, ॲक्सिस, एचडीएफसी सारख्या मल्टीनॅशनल बँका, अशोक, मुळा सहकारी आदी व्यापारी बँका, पतसंस्था मायक्रो फायनान्स कंपन्या यांच्याकडून मुद्दलाच्या तीनपटीने व्याज आकारणी होत आहे. या योजनेत क्षेत्राची, रकमेची व तारखेची अट टाकून सर्वच राजकीय पक्षाच्या सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. ऊस पिकांसह सर्वच पिकांचे उत्पादन ७० ते ८० टक्के घटले आहे.

त्या पिकावर घेतलेले पीक कर्ज कोठून फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्याच्या माध्यमातून होणारी सक्तीची वसुलीही थांबवावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी नगर जिल्हा शेतकरी संघटना, भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे ॲड. अजित काळे यांच्या नेतृत्वात दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT