Jalgaon News : खानदेशात खासगी, सहकारी व इतर बँकांनी पीक कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावण्यास सुरुवात केली आहे. मार्चअखेर अनेक शेतकरी कर्ज भरू शकले नाहीत.
यातच संबंधित बँकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सहकारी सोसायट्यांकडे याद्या पाठविल्या आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना हे कर्ज भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
शेतकऱ्यांना खरिपात फटका बसला. रब्बी हंगामातही जळगाव, धुळे व नंदुरबारात गारपीट, वादळी पावसाने नुकसान झाले आहे. फळे, भाजीपाल्याचे दर हिवाळा व उन्हाळ्यात कमीच होते. कापसाला दर मिळाला नाही.
कांदा, कापूस, केळी, मका आदी पिकांचे कवडीमोल दर होते. शेतकरी वित्तीय संकटात सापडले. या स्थितीत कर्जवसुलीला किमान पाच ते सात महिने स्थगिती द्यावी. पुढील खरीप हंगाम हाती आल्यानंतर कर्जवसुली सुरू करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
पीककर्जवितरण खानदेशात बऱ्यापैकी झाले आहे. पण आता थकबाकीदारांकडून वसुलीवर बँकांचा भर आहे. जिल्हा बँका सोसायट्यांकडून कर्ज वितरण करतात. खानदेशात सुमारे अडीच लाख पीक कर्जदार शेतकरी आहेत. यात सर्वाधिक कर्जदार शेतकरी हे जिल्हा बँकांकडून कर्ज घेणारे आहेत.
कर्जवसुलीला स्थगिती द्यावी व व्याज माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा निधीची जमवाजमव करून खरिपासाठी कार्यवाही केली. पण पाऊस हवा तसा नाही. पेरण्या रखडल्या आहेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.