Water  Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : आटपाडी तालुक्यात पाणीउपसा बंदी

Water Scarcity : पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली चालल्याने टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर महसूल विभागाने चौदा तलावांवर पाणीउपसा बंदी लागू केली आहे.

Team Agrowon

Sangli News : पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली चालल्याने टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर महसूल विभागाने चौदा तलावांवर पाणीउपसा बंदी लागू केली आहे. महसूल प्रशासनाने वीज मंडळाला उपसाबंदी करण्यासाठी तलावावरील वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिलेत. महावितरणने वीजपुरवठा खंडितही केला आहे.

आटपाडी तालुक्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चार गावे आणि वाडीवस्त्यावर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केलेत. पावसाळा संपत आला तरी पाऊस झालेला नाही. चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. बहुतांश तलावांतील पाण्याने तळ गाठला आहे. पिण्यासाठी अनेक तलावांत टेंभूचे पाणी सोडले आहे.

मात्र काही तलावांतून बेसुमार पाणीउपसा सुरू असल्यामुळे तलावांतील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महसूल प्रशासनाने उपाययोजनेची कठोर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

संभाव्य गंभीर पाणीटंचाई लक्षात घेऊन महसूल विभागाने १४ तलावांवर पाणी उपसाबंदीचा आदेश लागू केला आहे. यात आटपाडी, शेटफळे, बनपुरी, कचरेवस्ती, अर्जुनवाडी, माळेवस्ती, निंबवडे, दिघंची, झरे, घाणंद, गौरवाडी, जांभुळणी, विभूतवाडी आणि महाडिकवाडी या तलावांतून शेतीसाठी बेसुमार पाणीउपसा सुरू असल्यामुळे तहसीलदार बी. एस. माने यांनी उपसाबंदी करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे.

उपसाबंदी दुसऱ्याच तलावावर

शेटफळे येथे बाबर ओढा आणि कचरेवस्ती तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गावाला केला जातो. सध्या हा तलाव टेंभूच्या पाण्याने भरून घेतला आहे. मात्र तलावातून विद्युत पंपांद्वारे बेसुमार पाणीउपसा सुरू आहे.

दुसरीकडे गावातीलच रेबाई तलावात शेतकऱ्यांनी शेतीसाठी टेंभूचे पाणी घेतले आहे. त्यावर पिण्याच्या पाण्याची योजना नाही मात्र महसूल प्रशासनाने पाणी योजना असलेल्या तलावांवर उपसाबंदीचा आदेश न देता योजना नसलेल्या तलावावर आदेशाची अंमलबजावणी सुरू केल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT