Farmer Agrowon
ताज्या बातम्या

Namo Pension : नमो पेन्शनमध्ये कोल्हापुरातील तब्बल १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता

PM Kisan Sanman Nidhi Yojana : केंद्र सरकारकडून मागच्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पेन्शनच्या रुपातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार दिले जातात.

sandeep Shirguppe

Kisan Sanman Yojana : केंद्र सरकारकडून मागच्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पेन्शनच्या रुपातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार दिले जातात. दरम्यान याच धर्तीवर राज्य सरकारनेही ही योजना लागू केली आहे. यामुळे केंद्राचे २ आणि राज्याचे २ असे मिळून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये यावर्षीपासून देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान केंद्राकडून अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाहीत. याबाबत राज्याकडून प्रत्येक जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाला दिले होते.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी ५ लाख २८ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला होता.

राज्य आणि केंद्राकडून येणाऱ्या हप्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पात्र लाभार्थींची यादी तयार केली आहे. यामध्ये लाखो शेतकऱ्यांना यापासून मुकावे लागणार आहे. केंद्राच्या तेराव्या हप्त्यात जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना पेन्शन मिळालीच नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे नमो योजनेलाही या शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या १४ व्या हप्त्याचे पुढच्या दोन दिवसांत पैसे जमा होणार आहेत. याचबरोबर तेराव्या हप्त्यात जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. पेन्शन न आल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, चौकशी केली तर अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळत नाही.

आधार लिंक नाही, केवायसी पूर्तता नाही, याशिवाय आणखी काय कारणे आहेत. याचा शोध घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाला दिले आहेत.

दरम्यान जे शेतकरी नवीन अर्ज करण्यासाठी जातात त्यांची दखल कृषी विभागातील अधिकारी घेत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT