Flood Diversion Project Agrowon
ताज्या बातम्या

Flood Diversion Project : कृष्णा खोरे ‘फ्लड डायवर्जन प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता

Kolhapur Flood Water : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पावसाचे पाणी दरवर्षी कृष्णा नदीतून वाहून जाते. त्यामुळेच या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते.

Team Agrowon

Solapur News : पावसाळ्यात सांगली, सातारा, कोल्हापूर भागांतील पुरात वाहून जाणारे पाणी पुणे, सोलापूर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला देण्याच्या ‘कृष्णा खोरे फ्लड डायवर्जन’ प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच तत्त्वतः मान्यता दिली.

प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईन निंबाळकर यांच्या विनंतीवरून ‘कृष्णा खोरे फ्लड डायवर्जन’ प्रकल्पासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय झाला.

माणचे आमदार जयकुमार गोरे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, सहायक संचालक कपोले, अधीक्षक अभियंता कुमार पाटील, मुख्य अभियंता गुणाले आदी या वेळी उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे कशाप्रकारे दुष्काळी जनतेला कायमचा दिलासा मिळेल, हे अधिकाऱ्यांनी या वेळी नकाशाद्वारे पटवून दिले. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय झाला

‘उजनी’त आणणार पाणी

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पावसाचे पाणी दरवर्षी कृष्णा नदीतून वाहून जाते. त्यामुळेच या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते. त्या पार्श्‍वभूमीवर कृष्णा खोऱ्यातून ५१ टीएमसी पाणी उजनीत आणले जाणार आहे. त्या ठिकाणी पाणी साठवून दुष्काळी भागाला पुरवणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

२० कोटी रुपयांची गरज

या प्रकल्पासाठी अंदाजे २० कोटी रुपये लागणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे सातारा, पुणे जिल्ह्यांसह मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यांनाही मोठा लाभ होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Blacklisting: ‘त्या’ शेतकऱ्यांना टाकणार पाच वर्षांसाठी काळ्या यादीत

Chinese Raisins: चीनचा बेदाणा नेपाळमार्गे आयात शुल्कविना भारतात

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Onion Export : कांद्याला अनुदान, निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करा

Maize Cultivation : धुळे, नंदुरबारला मका लागवडीत वाढ

SCROLL FOR NEXT