Tubchi Irrigation Scheme : तुबची योजनेसंदर्भात महाराष्ट्राला पत्र देऊ

Irrigation Scheme : डी. के. शिवकुमार : आमदार विक्रम सावंत यांची भेट
Tubchi Irrigation Scheme
Tubchi Irrigation SchemeAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Government Scheme : जत, जि. सांगली ः तालुक्यात यंदा ओढवलेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार विक्रम सावंत यांनी बंगळूर येथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांची भेट घेऊन जतला तुबची (Tubchi Irrigation Scheme ) योजनेतून पाणी देण्याची विनंती करून दोन्ही सरकारांनी समन्वय साधून मार्ग काढण्याची मागणी केली.

शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना कर्नाटकच्या जलसंपदा विभागाला केली.

आमदार सावंत यांनी सोमवारी (ता. १०) बंगळूर येथे शिवकुमार यांची भेट घेतली. कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दुष्काळी स्थितीवर मार्ग काढण्यासंदर्भात सावंत यांनी शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. सध्या जतवर अस्मानी संकट ओढवले आहे.

अशा स्थितीत सीमावर्ती भागात दोन्ही राज्यांनी एकमेकांशी समन्वय साधल्यास पाणीप्रश्‍नावर मार्ग काढून दिलासा दिला जाऊ शकतो, असे मत सावंत यांनी व्यक्त केले.

Tubchi Irrigation Scheme
Agriculture Irrigation : चार साठवण तलाव निर्मितीस प्राधान्य देऊ

कर्नाटकने विजयपूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागासाठी तुबची योजना राबवली. या योजनेतून नैसर्गिक प्रवाहातून जत तालुक्यात पाणी येते. प्रतिवर्षी पावसाळ्यात तुबची योजना कार्यन्वित झाल्यानंतर तेथील ‘ओव्हर फ्लो’चे पाणी जत तालुक्यात येते. तीन वर्षांपासून या भागात पाणी येते.

जतच्या गडिनाड भागातील ४५ हून अधिक गावे तसेच ३० हजार एकराला लाभ होऊन आठ तलाव भरले जातात, अशी माहिती सावंत यांनी शिवकुमार यांना दिली. कर्नाटक व महाराष्ट्रात करार झाल्यास उन्हाळ्यात कर्नाटकला महाराष्ट्र पाणी देते, त्या बदल्यात पावसाळ्यात जतला लाभ दिल्यास दोन्ही राज्यांना फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tubchi Irrigation Scheme
Lift Irrigation Scheme : उपसा सिंचन योजनांना वीज दरवाढीचा ‘शॉक’

कर्नाटक पुढाकार घेईल : शिवकुमार
सावंत यांच्याशी तीस मिनिटे शिवकुमार यांनी चर्चा केली. कर्नाटक सकारात्मक असून, आम्ही महाराष्ट्राशी पत्रव्यवहार करू. यापूर्वी दोन्ही राज्यांत काय-काय अहवाल सादर झाला, त्याचाही अभ्यास करून किमान मानवतेच्या भूमिकेतून एकमेकांना मदत होईल, या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

तशा प्रकारच्या सूचनाही जलसंपदा विभागाला दिल्या. जतचे नेते बसवराज बिराजदार, मारुती मोरे, शिव बिराजदार आदी उपस्थित होते. नंतर सावंत यांनी कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकारी व सचिव राकेश सिंग यांचीदेखील भेट घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com