Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Anup Kumar : अनुप कुमार यांनी स्वीकारली कृषी विभागाची सूत्रे

Agriculture Department : कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून अनुप कुमार यांनी सूत्रे स्वीकारली.

Team Agrowon

Mumbai News : कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून अनुप कुमार यांनी सूत्रे स्वीकारली. कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची ग्रामविकास विभागात बदली झाली असून, डवले यांनी गेली चार वर्षे या विभागाचे नेतृत्व केले.

अनुप कुमार हे सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. नुकतेच ते परदेश दौऱ्यावरून परतले असून, पणन विभागात मोठा बदल त्यांनी केला आहे.

कृषी विभागाशी संलग्न असलेल्या अनेक विभागात त्यांनी याआधी काम केल्याने कृषी विभागाचा अनुभव त्यांना आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित सात विभागांत त्यांनी काम केले आहे.

सूत्रे स्वीकारल्यानंतर अनुप कुमार म्हणाले, ‘‘मला महाराष्ट्रातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

एक असा वर्ग आहे, ज्याला योग्य हस्तक्षेप आणि धोरणांसह संकटाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन आणि पाठिंब्याची गरज असते. अशा वर्गासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT