Marathi Language Literature Conference 2026: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलन बुधवार (ता. २३) रोजी तंजावर येथे होत आहे. तमिळनाडूतील तंजावर शहरात होणारे दक्षिण भारतातील हे पहिलेच मराठी साहित्य संमेलन असून, देशभरातून मराठी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. .तंजावरच्या भूमीत होणाऱ्या संमेलनाच्या निमित्ताने मराठी-तमिळ भाषेला जोडत साहित्य, कला आणि संस्कृतीचा जागर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर येथे दक्षिणेतील मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. त्यानंतर सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांनी तंजावर हे दक्षिणेतील मराठी संस्कृतीचे मुख्य केंद्र बनवले. सरफोजीराजेंनी साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याने या संमेलनाला सरफोजींचे नाव देण्यात आले आहे..International Pomegranate Conference 2026: पुण्यात ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद.संमेलनास २३ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजता ग्रंथदिंडीने प्रारंभ होणार आहे. श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे भोसले स्मारक, कलादालन, राजमहाल परिसर येथून ही दिंडी निघेल. मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांच्या हस्ते दिंडीचे पूजन होईल. यावेळी अश्विनी भगत, पल्लवी गोरे, सुधीर चव्हाण, रंजना भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराजवळील "पेथनन कलैयरंगम सभागृह" येथे या संमेलनाचे उद्घाटन तंजावर संस्थानचे प्रमुख श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते होईल..Marathi Language: मराठी भाषा : ओढा कमी, ताण अधिक.या ऐतिहासिक संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे हे भूषविणार आहेत. यावेळी निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले (प्रदेशाध्यक्ष, तामिळनाडू), प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील, उद्योजक आप्पासाहेब गुरव, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले आदींची उपस्थिती आहे..‘‘तंजावर येथील या मराठी संमेलनासाठी मुंबई, पुणे, सोलापूर मधून शेकडो मराठी साहित्यिक एकत्रित रेल्वेद्वारे संमेलनाला येणार असून धावत्या रेल्वेमध्ये विशेष प्रवासी साहित्ययात्री संमेलन रंगणार आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या कवितांचे वाचनही होणार आहे. यातून मराठी लोककला, लोकसंस्कृती आणि अभिजात मराठीचा प्रसार हाच मुख्य हेतू आहे.’’विक्रम मालन आप्पासो शिंदे आयोजक - सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलन, तंजावर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.