Irrigation Department : सात-बारावर विहिरींची नोंद घेण्यास टाळाटाळ

Agriculture Irrigation : खोदलेल्या विहिरीची सात-बारावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला. मात्र मंडळ अधिकाऱ्याने त्रुटी दाखवीत सहा अर्ज नामंजूर केले.
Well Scheme
Well SchemeAgrowon

Wardha News : येथील शेतकऱ्यांनी सिंचनाची गरज भागविण्यासाठी शेतात विहीर खोदली. खोदलेल्या विहिरीची सात-बारावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला. मात्र मंडळ अधिकाऱ्याने त्रुटी दाखवीत सहा अर्ज नामंजूर केले.

विचारणा करण्यासाठी शेतकरी गेले असता तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यात असलेला वाद चव्हाट्यावर आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

दरडोई उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवून गावातील शेतकऱ्यांनी नव्याने विहीर खोदकाम केले. काही शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंचनासाठी सात-बारावर विहिरीची नोंद करणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्याने नियमानुसार अल्लीपूर येथील तलाठी रमेश कपूर यांच्याकडे फेरफार अर्ज महिनाभरापूर्वी सादर केला.

Well Scheme
Wardha Well Work Stop : आर्वी तालुक्‍यात ३०० विहिरींचे काम रखडले

तलाठी यांनी सर्व अर्ज स्वीकारून आपली ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली. मात्र काही कागदपत्रांवर पटवारी यांनी लेखी पंचनामा दिला नसल्याचा शेरा मारून मंडळ अधिकारी लवकर यांनी अर्ज नामंजूर केले. विचारणा करण्यासाठी शेतकरी पटवारी कार्यालयात गेले असता दोन्ही अधिकाऱ्यांत असलेल्या अंतर्गत वादात शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे त्याच्यात झालेल्या वादातून दिसून आले.

Well Scheme
Boy Digs-up Well : वारे पठ्ठया... ' आईसाठी चिमुकल्याने खोदली घरासमोरच विहिरी

घटनेची माहिती शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पारसडे, नितीन सेलकर, विकास गोठे, निशांत लांभाडे यांना दिली. घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विनंती केली; मात्र यांचा वाद संपुष्टात येत नसल्याचे दिसून येत सर्व घटनाक्रम हिंगणघाट तहसीलदार यांना दूरध्वनी वरून सांगण्यात आला.

तसेच जिल्हाधिकारी यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सदर अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली. शेतकऱ्यांचे प्रश्‍न पंधरवड्यात निकाली न निघाल्यास आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

एक महिन्यापासून फेरफार टाकण्यात आले होते, त्रुटी होत्या. तर स्वतः मंडळ अधिकारी यांनी तलाठ्यांना सांगायला हव्या होत्या. फेरफार अर्ज नामंजूर करणे चुकीचे आहे. लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तलाठी कार्यालयात डेरा आंदोलन करू.
- सचिन पारसडे, जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, वर्धा
सात-बारावर विहीर चढली नसल्याने सोलर किंवा विद्युत वितरण कंपनीकडे अर्ज करता येणार नाही. विहिरीची नोंद सात-बारावर नसल्याने पीककर्जही रखडले आहे. तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी यांनी केलेले कृत्य प्रशासनाला लाजवेल असे आहे.
- नितीन सेलकर, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com