PDKV Akola Agrowon
ताज्या बातम्या

BT Cotton : बीटी कापूस वाण संशोधनाबाबत ‘पंदेकृवि-महाबीज’मध्ये करार

PDKV Mahabeej Update : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांच्यामध्ये कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित संकरित कपाशीच्या नवीन वाणांमध्ये बीजी २ जनुकांचा अंतर्भाव करण्याबाबत सामंजस्य करार झाला.

Team Agrowon

Akola PDKV News :कापूस हे विदर्भातील महत्त्वाचे पीक असून, या पिकाच्या विविध समस्यांचा सारासार अभ्यास करीत एकात्मिक कीड -रोगनियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीसह बीटी वाणाच्या (BT Cotton Veriety) विविध प्रजातींवर ध्येय निश्‍चित करून परिस्थितीनुरूप संशोधन करण्यात आले आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांच्यामध्ये कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित संकरित कपाशीच्या नवीन वाणांमध्ये बीजी २ जनुकांचा अंतर्भाव करण्याबाबत सामंजस्य करार झाला. या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. निळकंठ पोटदुखे, कनिष्ठ कापूस पैदासकार डॉ. नवीनचंद्र कायंदे व डॉ. सुरेंद्र देशमुख, तर महाबीजतर्फे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, गुणनियंत्रण व संशोधन महाव्यवस्थापक, डॉ. प्रफुल्ल लहाने, उत्पादन महाव्यवस्थापक विवेक ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बीटी कपाशी वाणातील बोंडांचा आकार ही मुख्य समस्या आता दूर झाल्याचे नमूद करताना विद्यापीठाने पाच ग्रॅमपर्यंत सरासरी बोंडांचे वजन असणारे नवीन वाण संशोधित केल्याचेही डॉ. गडाख म्हणाले.

शाश्‍वत शेती आणि समृद्ध शेतकरी संकल्पना कृतीत उतरवताना कृषी विद्यापीठे, शासकीय यंत्रणा, सहकारी नीम- सहकारी संस्थांच्या प्रभावी समन्वयातूनच सर्वांगीण ग्रामविकास साध्य होणार असल्याचे डॉ. गडाख अध्यक्षीय भाषणात म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांची मोठ्या बोंडाच्या कपाशीची वाढती मागणी लक्षात घेऊन कापूस संशोधन केंद्राद्वारे संशोधित संकरीत कपाशी वाणामध्ये महाबीजमार्फत बीटी जनुकांचा अंतर्भाव करण्यात येईल. या करारामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पादनशील संकरित कपाशी वाण लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

श्री. कलंत्रे म्हणाले, की जनुकीय परिवर्तित कापूस वाणांच्या उत्पादन आणि विपणनात महाबीज सर्व क्षमतेने सहयोगाची भूमिका स्वीकारेल.

हे सुधारित बीटी वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यापीठाने संशोधित केलेल्या उडीद, भुईमूग, हरभरा आदी पिकांच्या जातींनी देशभरातील बहुतांश भाग व्यापला आहे. येणारे बीटी वाणसुद्धा लोकप्रिय होईल असा आत्मविश्‍वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास खर्चे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नवीनचंद्र कायंदे यांनी तर डॉ. सुरेंद्र देशमुख यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा

Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीवर प्रशासक की राष्‍ट्रीय बाजार?

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

SCROLL FOR NEXT