BT Cotton Seed : बीटी कापूस बियाण्यांच्या सोळा लाख पाकिटांची विक्री

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून शासनानेच जून महिन्यातच बीटी बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः जून महिना म्हटला की शेतात पेरण्यांसाठी बियाणांची (Seed Demand For Sowing) मोठी मागणी असते. गल्ली ते दिल्लीपर्यंत बियाणे मार्केट (Seed Market) यावेळी तेजीत असते. यंदाही ते तेजीतच होते. जळगाव जिल्ह्यात सुमारे १२० ते १२५ कोटींची उलाढाल बियाणे विक्रीतून (Seed Sale) मे-जून महिन्यात झाली आहे. यंदा पाऊस चांगला असल्याचे हवामान विभागाने (Weather Department) सांगितले होते. यामुळे शेतकऱ्यांनी जून महिना उजाडताच हजारो रुपयांचे बीटी कापूससह इतर बियाणे खरेदी (Seed Buying) करून ठेवले आहे.

Cotton
कापूस पिकाची लागवड करताना काय खबरदारी घ्यावी ?

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून शासनानेच जून महिन्यातच बीटी बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात २५ मेस सर्व मोठ्या विक्रेत्यांकडे बियाणे आले होते. मात्र शासनाच्या निर्णयामुळे ते विक्री करू शकत नव्हते. हवामान विभागाने २९ मे पासूनच दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी वेगात केली. एक जूनला सर्वत्र बियाणे खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र होते.

नंतर मात्र पाऊस येईल, या आशेवर शेतकरी बियाणे खरेदी करीत राहिला. मात्र पावसाने झुलवत ठेवले. १७ जूनला बऱ्यापैकी पाऊस झाला. नंतर तुरळक पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हवामान विभागाचा अंदाज हा ‘अंदाज’च ठरत आहे.

उधारीने बियाणे खरेदी

शेतकऱ्यांनी उधारी, उसनवारी करून, कर्जे घेऊन बियाणे खरेदी केली आहे. बियाणे पेरून लवकर उत्पादन येईल व उधारी, उसनवारी फेडता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र पाऊस लांबतच चालला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात खतपुरवठा सुरळीत सुरू आहे. युरियाचा ६० हजार ९१० टन साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे. डीएपी खताचा ६ हजार ४९३ टन एमओपी खताचा ८ हजार ५४४ टन एनपीके संयुक्त खतांचा २८ हजार ६९० टन व एसएसपी खताचा ४७ हजार ११९ साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com