Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा भरताना आधार पडताळणीचा अडसर

Team Agrowon

Nashik News : चालूवर्षी खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना १ रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेत अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.मात्र अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अर्ज प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची आधार क्रमांक पडताळणी होत नसल्याने पीकविमा भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून आहे.सलग तिसऱ्या दिवशी अडचण आल्याने लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी शासनाने १ रुपयात पीक विम्याचा लाभ देण्याची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत खर्च येत असल्याच्या अनेक तक्रारी व त्यासंबंधी परिस्थिती ‘ॲग्रोवन’ने उजेडात आणली. त्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार व कृषी सचिवांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला. मात्र त्यानंतर आता तांत्रिक अडचणी येत असल्याने नवी डोकेदुखी शेतकऱ्यांना सतावत आहे.

शेतकरी स्वतः अर्ज प्रक्रिया करत असताना सर्व पत्ता व संबंधित माहिती भरल्यानंतर अर्ज करण्याच्या पुढील टप्प्यात शेतकरी पडताळणी केली जाते. त्यासाठी ‘फार्मर आयडी’ या रकान्यात आधार कार्ड (यूआयडी) हा पर्याय आहे. या पर्यायात आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर पुढील प्रक्रिया होत नाही.

परिणामी पडताळणी होत नसल्याने ‘फेल्ड’ असा संदेश तेथे दाखवला जात आहे. ही समस्या शनिवार (ता. २२) पासून होती. त्यामुळे अनेक शेतकरी केंद्रावर येऊनही परत गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

मुदतवाढ देण्याची गरज

संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या सामूहिक सेवा केंद्रांच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांचे अर्ज जमा करून घेतले जात आहेत. तांत्रिक समस्या दूर होऊन प्रणाली पूर्ववत झाल्यानंतर अडचणी दूर होतील, असे सांगितले गेले. एकीकडे ३० जुलै ही अंतिम मुदत आहे. तर मुदतीपूर्वी तीन दिवस तांत्रिक अडचण आल्याने आता मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शेतकऱ्यांनी मांडलेली सद्यःस्थिती

- सातबारा काढण्यासाठी वेबसाइट बंद; आता विमा वेबसाइटसुद्धा बंद

- शेतातील कामे बंद करून तासनतास बसावे लागते; तरी पीकविमा भरता येत नाही.

- पीकविमा भरला जात नाही; शेतकरी वंचित आहेत.

- शेतकऱ्यांची काम असली की; अडथळे तांत्रिक अडथळे नेहमीच का?

वेबसाइटवर काही तांत्रिक अडचण असेल तर तसा मॅसेज आला पाहिजे होता. आता कधी चालू होईल काही समजत नाही. शेवटची तारीख ३१ जुलै असल्याचे समजते. फॉर्म भरण्यास मुदत वाढ मिळणे गरजेचे आहे. कोणताही शेतकरी या विम्यापासून वंचित राहू नये असे वाटते.
- जयदीप भदाने, शेतकरी, कापशी, ता. देवळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT