Crop Insurance : शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवणे काळाची गरज

Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचा एक रुपयामध्ये पीकविमा उतरवावा.
Agrowon Sanvad
Agrowon Sanvad Agrowon
Published on
Updated on

Amravati News : शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचा एक रुपयामध्ये पीकविमा उतरवावा. पीकविम्यासाठी जास्त पैसे मागणाऱ्या सेतू केंद्राची तक्रार कृषी विभागाकडे करा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले.

नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सभागृहात अ‍ॅग्रोवन आणि कोरोमंडळ इंटरनॅशनल लिमिटेरडच्या संयुक्त विद्यमाने ‘अ‍ॅग्रोवन संवादा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

कापूस व सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन, याविषयावर हा कृषी संवाद झाला. प्रमुख वक्ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे तज्ज्ञ प्रफुल्ल महल्ले, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, कोरोमंडलचे वरिष्ठ क्षेत्रीय अधिकारी डॉ. विनयकुमार परिदा, मुख्य कृषी तज्ज्ञ विद्यावेत्ता कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे डॉ. विनेश रेगे, विपणन अधिकारी प्रीतम सिंग तसेच डॉ. माणिक शिगनारे उपस्थित होते.

Agrowon Sanvad
Crop Insurance : सहा लाख ५८ हजार शेतकऱ्यांचे पीकविमा अर्ज दाखल

संस्थेचे संस्थापक कॉ. भाई मंगळे, नानासाहेब मंगळे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी कोरोमंडलचे झोनल मॅनेजर बी. बी. पांडा उपस्थित होते.

डॉ. विनयकुमार परिदा व डॉ. विनेश रेगे यांनी सोयाबीन आणि कपाशी पिकांना आवश्यक असणाऱ्या खतांबाबत व कीटकनाशकांबाबत सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले.

Agrowon Sanvad
Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत आतापर्यंत ७८ लाख शेतकऱ्यांचा सहभाग

दरम्यान, दैनिक सकाळचे वितरण अधिकारी हुकूमचंद माने यांनी सकाळ अ‍ॅग्रोवनबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.कार्यक्रमाला विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय सुने, उपाध्यक्ष कृष्णराव अमृते, संचालक संजय मंगळे, प्रभाकर टाकळे, शेख अय्याज, नीलेश तायडे, अरुण दाभेकर, विजय नालट, वैभव राऊत, प्रमिला बोबडे, अर्चना कुऱ्हाडे, राहुल मंगळे, अ‍ॅग्रोवन वितरण प्रतिनिधी सचिन शेगोकर, सकाळ यीन प्रतिनिधी राजेश तोटे, अक्षय औंदकर, ऋषीकेश भेले, श्रीकांत आसटकर, ए. बी. चरपे, कृषी पर्यवेक्षक आर. डी. पांडे उपस्थित होते.

संचालन नेर विविध कार्यकारी संस्थेचे व्यवस्थापक सुनील मेहेरे यांनी केले. आभार माणिक शिनगारे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनिल शिंदे, काटपूर येथील प्रकाश इंगळे, नेरपिंगळाई येथील सकाळचे वितरक संजय डहाके, गणेश चुटके, नीलेश पांडे यांच्यासह नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com