Nursery  Agrowon
ताज्या बातम्या

Nursery Business : रोपवाटिका अधिस्वीकृतीसाठी दहा लाख रुपयांची आकारणी

Nitin Gadakari : प्रमाणित आणि उच्च प्रतीच्या रोपांची उपलब्धता अधिक होण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने खासगी रोपवाटिकांच्या अधिस्वीकृतीचा निर्णय घेतला.

Team Agrowon

Nagpur News : प्रमाणित आणि उच्च प्रतीच्या रोपांची उपलब्धता अधिक होण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने खासगी रोपवाटिकांच्या अधिस्वीकृतीचा निर्णय घेतला. या प्रक्रियेसाठी तब्बल दहा लाख रुपयांची आकारणी केली जाते.

हे शुल्क जास्त असल्याने ते कमी करावे, अशी मागणी ‘महाऑरेंज’ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एका पत्राव्दारे केली आहे. यापूर्वी एका कार्यक्रमात गडकरी यांनी देखील हे शुल्क कमी करण्याची सूचना ‘सीसीआरआय’ला केली होती. मात्र त्यानंतरही ते कमी करण्यात आले नाही हे विशेष.

विदर्भातील संत्रापट्ट्यात दुय्यम प्रतीच्या खुंटावर बांधल्या जाणाऱ्या रोगग्रस्त कलमांमुळे संत्रा बागा ऱ्हास होण्याचे प्रमाण वाढले आहे. हिमाचल प्रदेशमधून पुरवठा होणाऱ्या ‘गलगल’ नामक खुंटावर कलमे बांधली जात आहेत. त्यामुळे तयार होणारी रोपे ही रोगट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेकडून दर्जेदार व रोगमुक्‍त रोपांचे उत्पादन होते. त्यामुळे केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने खासगी संस्थांना आपले तंत्रज्ञान देत त्यांना अधिस्वीकृत करून रोपांचे उत्पादन वाढवावे, अशी गडकरी यांनी केली होती.

त्यानुसार संस्थेने तंत्रज्ञान देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी १० लाख रुपये शुल्क आकारले जाते. ही रक्‍कम जास्त असल्याने या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी ते कमी करावे, अशी मागणी आहे. ‘महाऑरेंज’चे संचालक मनोज जवंजाळ, श्रीधर ठाकरे, स्वप्नील धोटे यांनी हे पत्र दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT