Fraud Marriage  Agrowon
ताज्या बातम्या

Marriage Fraud : बनावट नवरीसह सहा जणांच्या टोळीला अटक

Fake Marriage News : जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील दोन तरुण मुलांशी विवाह करून रोख रक्कम व दागिने घेऊन पसार होणाऱ्या बनावट नवरी मुलीसह सहा जणांच्या टोळीला जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Team Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील दोन तरुण मुलांशी विवाह करून रोख रक्कम व दागिने घेऊन पसार होणाऱ्या बनावट नवरी मुलीसह सहा जणांच्या टोळीला जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या मुलीने मागील दीड वर्षात पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील सुमारे २० तरुणांशी विवाह करून आर्थिक फसवणूक केल्याची कबुली बनावट नवरी मुलीने प्राथमिक तपासात दिली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक), बनावट मावशी मीरा बंसी विसलकर (वय ३९), तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, दोघेही रा. अंबुजा वाडी, जि.नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६ रा. बोटा, ता. संगमनेर, जि. नगर), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४ रा. कुरकुटेवाडी, बोटा, जि.नगर), बाळू गुलाब सरवदे(वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. ध्रुवे करत आहेत.

जयश्री हिने अश्विनी रामदास गवारी असे बनावट नाव धारण करून जुन्नर तालुक्यातील खोडद येथील हरीश गायकवाड यांच्याशी २८ मार्च २०२३ रोजी आळंदी येथे विवाह केला. हा विवाह जमवण्यासाठी आरोपींनी गायकवाड यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये घेतले.

लग्नानंतर जयश्री धार्मिक विधीसाठी चार ते पाच दिवस सासरी राहिली. त्या नंतर विसलकर ही तिला माहेरी घेऊन गेली. त्या नंतर जयश्री दागिन्यांसह फरार झाली. याच प्रकारे या टोळीने १० मे २०२३ रोजी याच मुलीस संध्या विलास बदादे असे नाव देऊन गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथील सागर प्रभाकर वायकर यांच्याशी जुन्नर येथे विवाह केला होता. आरोपींनी त्यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपये घेतले होते.

नोकरी नसलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांची वेळेत लग्न होत नाहीत. या समस्येचा फायदा घेऊन या टोळीने बनावट नवरी मुलगी, मावशी, नातेवाईक तयार करून मध्यस्थी मार्फत कमिशन घेऊन विवाह जमवून एकाच मुलीचे वीस तरुणांसोबत विवाह लावून दिले. नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार येताच पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले.
- पृथ्वीराज ताटे, सहायक पोलिस निरीक्षक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT