Register marriage: खर्चाला फाटा देत त्यांनी केलं रजिस्टर लग्न!

Team Agrowon

मोठेपणा मिरवण्यासाठीचा एकमेव मार्ग

लग्न हे इर्षा करण्याचे मैदान नाही किंवा संपत्ती व मोठेपणा मिरवण्यासाठीचा एकमेव मार्ग नाही तसेच भोगल्याशिवाय पर्याय नाही अशी कोणतीही शिक्षा नाही.

marriage | Agrowon

बिनकामच्या पोकळ

मोठेपणा मिरविण्याच्या इर्षेपोटी आणि पै- पाहुण्यांच्या ' बिनकामच्या पोकळ ' अग्रहापोटीच कित्येक पोरींच्या बापांनी आत्महत्या केल्या तर कित्येक कुटुंबे तोळा - अर्ध्या तोळ्याच्या पै - पाहुण्यांच्या इर्षेच्या/अहंकाराच्या वादात देशोधडीला लागलेली मी स्वतः समाजात आणि कोर्टात बघितली आहेत आणि बघतोच आहे.

marriage | Agrowon

अंदाधुंद खर्चाने लग्न

आता मात्र या लग्न विषयावर विचार करावीच लागेल. मी कोर्टात वकिली करत असताना लग्नातल्या अंदाधुंद खर्चाने लग्नानंतर आलेल्या पैशाच्या अडचणीतून भांडणे सुरू झाल्याने कुटुंबाकुटुंबात आणि नवरा - बायकोत होणारी भांडणे विकोपाला गेलेली आणि त्याचा शेवट घर फुटण्यात आणि सोडचिठ्ठी झाल्यात स्वतः बघितली आहेत.

marriage | Agrowon

लग्नातील विधी

कोणी स्पष्टपणे बोलेल की नाही मला माहीत नाही पण मला मनापासून आणि प्रामाणिकपणे सांगावे वाटते की, कोणतेही लग्न हे लग्नातील विधी केल्याच्या कारणावरून यशस्वी होत नाही आणि लग्नात विधी न केल्याचा कारणावरून तुटत नाही.

marriage | Agrowon

वेदांचा तो अर्थ अम्हाशीच ठावा

पत्रिका आणि आकाशातील ग्रहताऱ्यांवरून कोणाचेही भविष्य ठरत नाही असा माझा ठाम विश्वास आहे.

नाहीतर तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेच आहे की,

वेदांचा तो अर्थ अम्हाशीच ठावा ,येरांनी वहावा भारमाथा !

marriage | Agrowon

लग्नानंतरच्या आर्थिक अडचणीत मदत

आणि विशेष बाब अशी की, एखादा अपवाद वगळता "धूमधडाक्यात मोठं लग्न करा.." असे म्हणणारा कोणताही पाहुणा,भावकी किंवा मित्र - मैत्रीण लग्नानंतरच्या आर्थिक अडचणीत मदत करून साथ देत नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्यांचं एक ठीक पण इतर कुटुंबांचे काय ?

marriage | Agrowon
Animal | Agrowon