Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी साडेचारशे कोटींची मागणी

Crop Damage Compensation : नांदेडमध्ये जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : नांदेडमध्ये जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. हा फटका जिल्ह्यातील कंधार व लोहा तालुके वगळता इतर १४ तालुक्यांतील ६ लाख ३९ हजार २८७ शेतकऱ्यांना बसला. यात जिरायती, बागायती व फळपिकांसह जमिनी खरडूनही नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविला.

यात शेतीपिकाच्या नुकसानीबद्दल ४२० कोटी ४६ लाख तर जमिनी खरडून केल्यामुळे ३१ कोटी ७३ लाख अशी एकूण ४५२ कोटी २० लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

नांदेडमध्ये जून महिन्यांत जेमतेम झालेल्या पावसानंतर जुलैमध्ये तुफान पाऊस झाला होता. हा पाऊस सर्वच तालुक्यांत बरसला. परंतु शेतीपिकांचे नुकसान मात्र कंधार व लोहा तालुका वगळात इतर १४ तालुक्यांत नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला होता.

यात चार लाख ९० हजार ९८३ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, एक हजार ४९६ हेक्टर बागायती, तर २६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.

यात शेतीपिकाच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ४२० कोटी ४६ लाख तर जमिनी खरडून केलेल्या आठ हजार ७२३ शेतकऱ्यांना भरपाईसाठी ३१ कोटी ७३ लाख रुपये अशी एकूण ४५२ कोटी २० लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

हे सानुग्रह अनुदान जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे, फळपिकांसाठी हेक्टर २२ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकांसाठी १७ हजार रुपये प्रतिहेक्टर दोन मर्यादेपर्यंत मिळणार आहेत.

शेतीचे नुकसान झालेल्यांना ३१ कोटी ७३ लाख

संपूर्ण जमिनी खरडून गेलेल्या ५५२९ हेक्टर क्षेत्राच्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ४७ हजार प्रमाणे २५ कोटी ९८ लाख, तर दुसऱ्याच्या शेतातील माती वाहून पिकांचे नुकसान झालेल्यांना ३१९१ हेक्टर क्षेत्राच्या शेतकऱ्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे पाच कोटी ७४ लाख रुपये मिळणार आहेत.

कंधार, लोहा तालुके कायम दुर्लक्षित

जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. परंतु यात कंधार व लोहा तालुक्यांत झाले नसल्याचा अहवाल शासनाला कळविला आहे. या दोन तालुक्यांतही अनेक शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

असे असताना नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी कळविला आहे. त्यामुळे दोन तालुक्यांतील हजारो शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. यापूर्वीही लोहा तालुक्यांना पीकविम्याची भरपाई मिळाली नव्हती.

तालुकानिहाय बाधित शेतकरी, नुकसान क्षेत्र व अपेक्षित निधी

(क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका बाधित शेतकरी नुकसान क्षेत्र अपेक्षीत निधी

नांदेड ५१०८ ३२८५.४० २,७९,२५,९००

अर्धापूर ३१५३३ २५१५०.७० २१,३७,८०,९५०

कंधार शून्य शून्य शून्य

लोहा शून्य शून्य शून्य

देगलूर ६०८४२ ५७१०५ ४८,५४,४८,५००

मुखेड ७८१५८ ६६५७४ ५७,५५,७१,९००

बिलोली ५७१९३ ४४६८२ ३७,९८,२५,०००

नायगाव ५३९२७ ३५४०० ३०,०९,००,०००

धर्माबाद २८९७३ १८८२६ १६,०२,३१,०००

उमरी ३३९१९ २३१३० १९,६६,०५,०००

भोकर ४२८६२ २६२००.४० २२,३०,६०,४००

मुदखेड ३०११३ १४१३६.८० १२,०७,४३,३००

हदगांव ७५९५९ ५५४३१.०३ ४७,११,६३,७५५

हि.नगर ३४६३६ २९८९१ २५,४०,७३,५००

किनवट ५८९०५ ६५००० ५५,६४,१२,०००

माहूर २५७८३ २७९२८.३४ २३,८९,१९,६३०

एकूण ६१७९११ ४९२७४०.६७ ४२०,४६,६०,८३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT