Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात ८३ टक्के पेरण्या

Satara Khari Sowing : पश्चिम भागात पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून, पूर्व भागात कमी पेरणी झाली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पेरण्याच्या कामांना गती आली आहे. बुधवार (ता. ४) पर्यंत ८३.३९ टक्के पेरणीची कामे उरकली आहे. पश्चिम भागात पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून, पूर्व भागात कमी पेरणी झाली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यात उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना पेरणी करता आली आहे. पश्‍चिम भागात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने या परिसरातील ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. या ऊलट दुष्काळी तालुक्यातील परिस्थिती असून, ६० ते ६५ टक्के पेरण्या झाल्या. मात्र पाऊस नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होणार आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण (ऊस वगळून) दोन लाख ८८ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र असून, यापैकी बुधवारअखेर दोन लाख ४० हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ८३.३९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ७४ हजार ८०० हेक्टर असून, सोयाबीनची ८१ हजार ५०२ हेक्टर लागवड झाली असून, सरासरीपेक्षा जास्त १०३ टक्के पेरणी झाली आहे.

भाताचे ४३ हजार ९७८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३७ हजार ३०६ हेक्टरवर लागवड झाली आहे. खरीप ज्वारीचे ११ हजार १५३ सर्वसाधारण क्षेत्रापैकी ७६६४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

भुईमुगाचे २९ हजार ४३५ सर्वसाधारण क्षैत्रापैकी २६ हजार ७४२ हेक्टरवर लागवड झाली आहे. जून महिन्यापासून आडसाली उसाची लागवड झाली असून, आतापर्यंत २० हजार २२३ हेक्टर लागवड झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी हेक्टरमध्ये

सातारा २८,११५, जावळी १६,२६७, पाटण ४४,११९, कऱ्हाड ३६,७२१, कोरेगाव २०,६९०, खटाव २९,६९५, माण २७,९१७, फलटण ९,९०७ खंडाळा ८,०८९, वाई १४,९६६, महाबळेश्‍वर ४,०१८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT