Kharif Sowing : खानदेशात ७५ हजार हेक्टर क्षेत्र नापेर

Kharif Season 2023 : खानदेशात यंदा जूनमधील कमी अधिक पाऊस व रब्बी हंगाम साधण्याचे नियोजन यामुळे अनेक शेतकऱ्यांनी क्षेत्र नापेर ठेवले आहे. पेरण्या लांबल्या आहेत.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा जूनमधील कमी अधिक पाऊस व रब्बी हंगाम साधण्याचे नियोजन यामुळे अनेक शेतकऱ्यांनी क्षेत्र नापेर ठेवले आहे. पेरण्या लांबल्या आहेत. तर काळ्या कसदार जमिनीत अतिपावसात गेले दोन वर्षे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, ज्वारी, मका या पिकांची अतोनात हानी झाली आहे. यामुळे यंदा खानदेशात ७५ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.

दरवर्षी धुळे, जळगाव, नंदुरबारमधील तापी, पांझरा, अनेर, सुकी नदीच्या लाभक्षेत्रातील काही शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. पीक लागवडीत खंड पडावा, जमीन सुपीकता टिकून राहावी आणि रब्बी हंगाम जोमात यावा, यासाठी अनेक शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. या नापेर क्षेत्रात ऑक्टोबरअखेर हरभरा, दादर ज्वारी या कोरडवाहू पिकांची पेरणी करतात. ही पिके जोमात येतात. शिवाय या पिकांमुळे जमीन सुपीकता वाढते, असे शेतकरी मानतात.

Kharif Sowing
Kharif Sowing : खानदेशात पेरण्या पूर्णत्वाकडे; सर्वाधिक कापूस पीक

मोठे शेतकरी अधिकचे क्षेत्र नापेर ठेवतात. गेल्या खरीप हंगामात देखील खानदेशात सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले होते. कारण जूनमध्ये पिके मोडावी लागली होती आणि जुलैमध्ये अतिपावसाने नुकसान दिसत होते. काहींनी पिके मोडल्यानंतर संबंधित क्षेत्रात नव्याने पेरणी टाळली व पुढे रब्बीमध्ये कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारी पीक घेतले. असेच नियोजन यंदाही शेतकरी करीत आहेत. नापेर क्षेत्राची मशागत करून ठेवली आहे. तसेच पुढेही त्यात बैलजोडीने मशागत किंवा वखरणी केली जाईल.

Kharif Sowing
Kharif Sowing : राज्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात

अतिपावसात शेतात पाणी साचणार नाही, यासाठी शेतातून पाणी वाहून नेणारे मार्ग मोकळे केले आहेत. नापेर क्षेत्र यंदा ८० ते ८२ हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक नापेर क्षेत्र राहू शकते. त्यापाठोपाठ धुळ्यातील शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात क्षेत्र नापेर राहील, अशी माहिती मिळाली.

नापेर क्षेत्र (हजार हेक्टरमध्ये)

जळगाव...४८

धुळे...१८

नंदुरबार...

पेरणीसाठी आवश्यक पाऊस अनेक भागात झाला. पेरण्याही पूर्ण होत आल्या आहेत. परंतु अनेक शेतकरी जमीन सुपीकता टिकून राहावी, पुढे रब्बीसह अन्य पिकांची पेरणी व्हावी, यासाठी क्षेत्र नापेर ठेवतात. त्याचे प्रमाण तापी, गिरणा काठी काळ्या कसदार जमिनीच्या भागात आढळते.
- कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे.
दरवर्षी पाच ते सहा एकर क्षेत्र नापेर ठेवतो. रब्बी हंगामात त्यात ज्वारी पेरल्यानंतर चांगले उत्पादन मिळते. जमीन सुपीकता टिकून राहते.
- पंकज पाटील, शेतकरी, तुरखेडा, ता. जि. जळगाव.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com