Sowing Agowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing Hingoli : हिंगोली जिल्ह्यात ६२.७९ टक्के पेरणी

Kharif Season 2023 : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मंगळवार (ता. ११) अखेरपर्यंत ३ लाख ६१ हजार ५४ पैकी २ लाख २६ हजार ६९९ हेक्टरवर (६२.७९ टक्के) पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मंगळवार (ता. ११) अखेरपर्यंत ३ लाख ६१ हजार ५४ पैकी २ लाख २६ हजार ६९९ हेक्टरवर (६२.७९ टक्के) पेरणी झाली आहे.

आजवरच्या पेरणीक्षेत्रात सोयाबीन १ लाख ७६ हजार ८५१ हेक्टर, तूर २३ हजार ५०४ हेक्टर, तर कपाशीच्या १८ हजार ६९९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली.

जून महिन्यात पाऊस अल्प झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झालेल्या मंडलांतील शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु कमी पाऊस झालेल्या मंडलांत पेरणीस उशीर झाला आहे. सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी १ लाख ७६ हजार ७३३ हेक्टर (६८.९३ टक्के) पेरणी झाली.

तुरीची ४५ हजार ३०६ पैकी २३ हजार ५०४ हेक्टर (५१.८८ टक्के), मुगाची ७ हजार ७८१ पैकी ३ हजार १९ हेक्टर (३८ टक्के), उडदाची ५ हजार ८७९ पैकी २ हजार २६ हेक्टर (३४.४६ टक्के), ज्वारीची ५ हजार ५९५ पैकी २ हजार २२४ हेक्टर (४०.४० टक्के), बाजरीची ८८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी १८ हजार ६५९ हेक्टरवर (४८.०६ टक्के) लागवड झाली. तृणधान्यांची ६ हजार ७४५ पैकी २ हजार ६०४ हेक्टर (३८.६१ टक्के), कडधान्यांची ५८ हजार ९९३ पैकी २८ हजार ५८५ हेक्टर (४८.४५ टक्के), गळीत धान्यांची २ लाख ५६ हजार ४९५ पैकी १ लाख ७६ हजार ८५१ हेक्टरवर (६८.९५ टक्के) पेरणी झाली आहे, अशी माहिती तंत्र अधिकारी (साख्यंकी) आर. के. क्षीरसागर यांनी दिली.

तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

हिंगोली ७७१४४ ४८१३३ ६२.३९

कळमनुरी ६९१२१ .४३५५५ ६३.०१

वसमत ६३८७२ ३३३६० ५२.२३

औंढा नागनाथ ६५०१३ ४५६६० ७०.२३

सेनगाव ८५९०२ ५५९९१ ६५.१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT