Ratnagiri Water Stock Agrowon
ताज्या बातम्या

Disaster Management : रत्नागिरी जिल्ह्यातील ५३७ जणांना केले स्थलांतरित

Team Agrowon

Ratnagiri News : रायगडमधील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ‘झीरो कॅज्युलिटी मोहीम’ हाती घेतली आहे. सर्व यंत्रणांना जागरुक राहण्याचे आदेश दिले असून धोकादायक ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात आले आहेत.

डोंगर पायथ्याशी असणाऱ्या गावांवर विशेष लक्ष ठेवून ग्रामस्थांशी समन्वय साधताना ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात १३९ कुटुंबांतील तब्बल ५३७ जणांना सुरक्षेच्या कारणावरून प्रशासनाने स्थलांतरित केले.

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली.

ग्रामीण भागात कार्यरत तलाठी, पोलिस कर्मचारी, सरपंच, पोलिस पाटील यांच्याकडून दरडप्रवण क्षेत्राची माहिती घेऊन धोकादायक ठिकाणच्या ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याबाबत सूचना केल्या.

नदी काठावर राहणाऱ्यांनाही त्या ठिकाणाहून हलविण्याच्या दृष्टीने दक्षतेच्या सूचना दिल्या. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर दरड प्रवणक्षेत्र आणि पूर स्थितीशी सामना करणाऱ्या जिल्ह्यातील १३९ कुटुंबांतील ५३७ जणांचे स्थलांतर करण्यात आले. चिपळुणात १९ कुटुंबातील ६५, खेडमधील १०३ कुटुंबातील ३८० जणांना स्थलांतरित करण्यात आले.

पावसाचा जोर कायम

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत लांजा तालुक्यात सर्वाधिक ९९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ५२.८९ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड २०, दापोली १०, खेड ३६, गुहागर १८, चिपळूण ३५, संगमेश्वर ९२, रत्नागिरी ७५, लांजा ९९, राजापूरमध्ये ९१ मिमी पाऊस झाला.

खेड, राजापूर आणि संगमेश्वरात तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प असून तिन्हींमधील एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता १८२.६९ दशलक्ष घनमीटर आहे. मध्यम पाटबंधारे प्रकल्प नातुवाडी १८.३७७ (दलघनमीटर), मध्यम पाटबंधारे प्रकल्प गडनदी ६६.३९०, मध्यम पाटबंधारे प्रकल्प अर्जुना ७२.५६० या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली या नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT