Farmer Plant Variety Rights: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांच्या चार पीकवाणांना राष्ट्रीय स्तरावर कायदेशीर मालकी अधिकार (नोंदणी प्रमाणपत्र) प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये जायफळाच्या तीन तर शेवग्याच्या एका वाणाचा समावेश आहे. मुळदे संशोधन केंद्रातील डस (DUS) चाचणी केंद्रामुळे ही नवी वाणे प्रकाशात आली आहेत..शेतकऱ्यांनी पारंपरिकरीत्या जतन केलेल्या, विकसित केलेल्या किंवा संशोधित केलेल्या पीकवाणांना नवी दिल्ली येथील पीकवाण संरक्षण व शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून कायदेशीर मालकी अधिकार दिले जातात. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवले जातात..Innovative Farmer Award : अंकुश पडवळे यांना केंद्राचा नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार.मुळदे संशोधन केंद्रामार्फत कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील अच्युत तेंडोलकर यांनी विकसित केलेल्या जायफळाच्या दोन वाणांचे, सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील रघुनाथ नाईक यांच्या जायफळ वाणाचे तसेच मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर यांनी संशोधित केलेल्या लाल शेवगा वाणाचे प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. डी.यू.एस. चाचणी व पीकवाण परीक्षणानंतर हे प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले..त्यानुसार तेंडोलकर यांच्या वाणांना ‘तेंडोली समर्थ-१’ व ‘तेंडोली समर्थ-२’, नाईक यांच्या वाणाला ‘गीतरोझ’, तर फोंडेकर यांच्या लाल शेवगा वाणाला ‘सिंधुदुर्ग कुंभारमाठ उत्तम’ या नावाने नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे..Smart Agri Innovation: मुख्यमंत्री भगवंत मान आणि दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळात चर्चा; स्मार्ट शेतीसाठी करणार सहकार्य.याशिवाय रायगड जिल्ह्यातील दिवेआगर भागातील तीन शेतकऱ्यांच्या तीन कोकम वाणांना ‘अमेय कोकम’, ‘शांभवी कोकम’ आणि ‘वैष्णवी कोकम’ या नावाने नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच रत्नागिरीतील जायफळाच्या दोन व रायगडातील तीन अशा आणखी पाच वाणांनाही नोंदणी मिळाली आहे. शेतकऱ्यांना पीकवाणांचे कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी मुळदे संशोधन केंद्राचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, प्रकल्प प्रमुख डॉ. महेश शेंडगे, सहप्रकल्प प्रमुख डॉ. जया वाघ, वरिष्ठ संशोधन छात्र हर्षल नाईक व सुषमा पालव यांनी विशेष प्रयत्न केले..शेतकऱ्यांनी आपल्याकडील जुने व नावीन्यपूर्ण वाण नोंदणीसाठी पुढे आणल्यास त्या पिकाखालील क्षेत्र व उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. नोंदणीस कोणतीही फी नाही. अधिक माहितीसाठी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील डी.यू.एस. चाचणी केंद्राशी संपर्क साधावा.- डॉ. विजय दळवी, सहयोग अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.