Nagpur Highway Accident agrowon
ताज्या बातम्या

Nagpur Highway Accident : नागपूर महामार्गावर शेकडो मेंढ्या चिरडल्या, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Accident Nagpur Highway : ४२ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून या कळपातील अनेक मेंढ्या जखमी आहेत.

Team Agrowon

Nagpur Highway : नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मौदा येथील प्रसिद्ध रबडीवाला येथील टी पॉईंट परिसरात अपघाताची घटना घडली. आज (ता. ११) मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने शेकडो मेंढ्या चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ४२ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून या कळपातील अनेक मेंढ्या जखमी आहेत.

भल्या पहाटेची वेळ असल्याने या घटनेनंतर मेंढ्यांना चिरडणारे भरधाव वाहन घटनास्थळावरून फरार झाले आहे. या अपघातानंतर सुमारे १०० ते १५० मीटरपर्यंत रायपूर महामार्गावर मेंढ्यांचे मृतदेह पडले होते.

दरम्यान या भागात सध्या शेतात पिकांची पेरणी सुरू असल्याने हा मेंढ्यांचा कळप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ नागपूर-भंडारा मार्गावरून परत जात असताना मौदा टी पॉईंटवर हा अपघात घडला. या अपघातास कारणीभूत अज्ञात वाहन ट्रक असून सीसीटीव्हीद्वारे त्याचा, चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

त्यात मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. हा मेंढपाळ राजस्थानचा होता. तो परतवाडाहून अंजनगावकडे जात असताना ट्रकने त्याच्या मेंढ्यांना चिरडले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT