Orange Rate Agrowon
ताज्या बातम्या

Orange Export : संत्रा निर्यातीसाठी ३० टक्के अनुदान द्यावे

खासदार अनिल बोंडे यांची राज्यसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात मागणी

Team Agrowon

अमरावती : बांगलादेशने आयात शुल्कात केलेल्या वाढीमुळे संत्रा निर्यात प्रभावी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकार सोबत चर्चा करून हे शुल्क कमी करावे किंवा निर्यातीसाठी २५ ते ३० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राज्यसभा सदस्य अनिल बोंडे यांनी केली आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नागपुरी संत्र्याचे सुमारे पाच लाख टन उत्पादन होते. त्यापैकी एक लाख टन संत्रा हा बांगलादेशला निर्यात केला जातो. मात्र आर्थिक अडचणीत असलेल्या बांगलादेशने २०१९ पासून सातत्याने आयात शुल्कात वाढीचे धोरण अवलंबिले आहे. २०१९ साली २० रुपये, २०२० या वर्षात ३०, २०२१ मध्ये ५१ तर २०२२ मध्ये थेट ६३ रुपये प्रति किलो असे आयात शुल्क नागपूरी संत्र्यावर आकारण्यात येत आहे. नागपुरी संत्र्याचा बांगलादेश हा मोठा आयातदार असल्याने त्या भागात संत्रा निर्यात न झाल्यास देशांतर्गत बाजारपेठेत संत्रा दर दबावात राहतात. दर वर्षी हंगामात रोज १२० ट्रक नागपुरी संत्रा रस्तेमार्गे बांगलादेश सीमेवर पोहोचतो. तिथून बांगलादेश मधील वाहतूकदार आपल्या ट्रकमध्ये लोडिंग करतात.

मात्र वीस रुपये किलो असलेला संत्रा आयात शुल्काच्या कारणामुळे ८३ रुपये किलोवर पोहोचतो. हा दर परवडणारा नसल्याने आयातदार कमी दरात संत्र्याची मागणी करतात. या सर्व समस्येवर समाधान म्हणून शासनाने हस्तक्षेप करून बांगलादेश सरकारशी चर्चा करावी व याप्रश्नी तोडगा काढावा. आयात शुल्काच्या प्रश्नावर तोडगा निघाल्यास संत्रा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे अनिल बोंडे यांनी राज्यसभेत सांगितले. आयात शुल्क कमी करणे शक्य नसल्यास या भागातून संत्र्याची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना २५ ते ३० टक्के निर्यात अनुदान देण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नी केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे या भागातील उत्पादकांचे लक्ष लागले आहे. द्राक्ष उत्पादकांना सुरुवातीला पणन मंडळाने निर्यातीसाठी अनुदान दिले होते. त्याच धर्तीवर संत्रा निर्यात प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानाची गरज आहे.

- मनोज जवंजाळ, संचालक, महाऑरेंज एकूण पाच लाख टन उत्पादनापैकी २५ टक्के ही लहान आकाराची फळे असतात. त्यावर प्रक्रिया झाल्यास बाजारात केवळ चांगल्या प्रतीचा संत्र येणार आहे. त्यामुळे देशांतर्गतच मागणी राहून कुठेही निर्यातीची गरज भासणार नाही. पतंजली आणि जैन फार्म फ्रेश हे दोन्ही प्रकल्प सुरू होण्याची गरज आहे. - नीलेश रोडे, संत्रा प्रक्रिया उद्योजक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT