Team Agrowon
विदर्भातून संत्रा निर्यातीला (Orange Export) प्रोत्साहन मिळावे याकरिता पहिल्या टप्प्यात पणन मंडळाकडून निर्यात सुविधा (Export Facility) सवलतीत पुरविण्यात आल्या पाहिजे.
त्यानंतर शेतकऱ्यांकडून निर्यात वाढल्यास हे अनुदान (Subsidy) किंवा सवलतींमध्ये कपातीचे धोरण असावे,
अशा प्रकारची मांडणी महाऑरेंजसह (Mahaorange) निर्यातदार व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
संत्रा निर्यातीला प्रोत्साहन मिळावे याकरिता अभ्यासासाठी एका कंपनीची नियुक्ती पणन मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मॕग्नेट’ (महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क प्रोजेक्ट) प्रकल्पस्तरावरून करण्यात आली आहे.
ही समिती संत्रा निर्यातीसंदर्भाने विविध घटकांशी चर्चा करून तसेच बाजाराच्या अभ्यासाअंती आपला अहवाल देणार आहे.
परिणामी, निर्यातीला खरंच चालना मिळावी, असे वाटत असेल तर कंटेनरची उपलब्धता अनुदानावर झाली पाहिजे.
निर्यातीमध्ये ग्रेडिंग, कोटिंग आणि आकर्षक बॉक्स पॅकिंग या सर्व बाबींचे महत्त्व आहे.
या सुविधा देखील सवलतीत किंवा पहिल्या टप्प्यात निःशुल्क मिळाल्या तर येत्या काळात त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढता राहील.