Water Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : जिंतूर तालुक्यातील ३ लघु तलाव कोरडेच

Water Shortage : पावसाळ्यातील दोन महिने उलटले तरीही अजून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यामुळे परभणी जिल्ह्यातील लघु तलावांतील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही.

Team Agrowon

Parbhani News : पावसाळ्यातील दोन महिने उलटले तरीही अजून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यामुळे परभणी जिल्ह्यातील लघु तलावांतील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. गुरुवारपर्यंत (ता. ३) जिल्ह्यातील २२ पैकी १२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी १० टक्के पाणीसाठा जमा झाला होता.

अल्प पावसामुळे पाणीसाठा जमा न झाल्यामुळे जिंतूर तालुक्यातील ३ तलाव अजूनही कोरडेच आहेत. तर विविध तालुक्यांतील ७ लघु तलावांतील पाणीसाठा अद्याप जोत्याखालीच आहे. दोन मध्यम प्रकल्पांत सरासरी २० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.

गतवर्षीच्या तुलनेत अल्प पाणीसाठा जमा झाल्यामुळे येत्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्यासह, सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही.

परभणी जिल्ह्यातील २२ पैकी जिंतूर तालुक्यातील ६ लघु तलाव उन्हाळ्यात कोरडे पडले होते. पाणलोटात झालेल्या पावसामुळे केहाळ, चिंचोली देवगाव या तलावात पाणीसाठा जमा झाला.

परंतु अल्प पावसामुळे चारठाणा, जोगवाडा, बेलखेडा हे अद्याप कोरडेच आहेत. केहाळ, मांडवा, दहेगाव, देवगाव (ता. जिंतूर), नखातवाडी (ता. सोनपेठ), टाकळगाव, कोद्री (ता. गंगाखेड) या ७ लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखालीच आहे. जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लघु तलावांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

गुरुवारपर्यंत (ता. ३) लघुप्रकल्पांमध्ये सरासरी १० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यात पेडगाव (ता. परभणी) तलावात १३ टक्के, आंबेगाव (ता. मानवत) येथील तलावात ९ टक्के, वडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के, आडगाव (ता. जिंतूर) येथील तलावात ३ टक्के, चिंचोली (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के,

भोसी (ता. जिंतूर) येथील तलावात १५ टक्के, कवड (ता. जिंतूर) येथील तलावात ३ टक्के, पाडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. झरी (ता. पाथरी) येथील तलावात ८४ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील तलावात १६ टक्के, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील तलावात ३० टक्के, तांदुळवाडी (ता. पालम) येथील तलावात २० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

गतवर्षी (२०२२) याच तारखेला लघुतलावांमध्ये सरासरी २४.८८ दलघमी (५९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. गुरुवारी (ता. ३) जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पांत सरासरी २० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यात करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पांमध्ये २१ टक्के तर मासोळी (ता. गंगाखेड) येथील मध्यम प्रकल्पात १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी (२०२२) याच तारखेला मध्यम प्रकल्पात सरासरी ७१ टक्के पाणीसाठा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT