Water Crisis : भर पावसाळ्यात पाणी टंचाईचे संकट

Water Shortage : पावसाचे तब्बल दोन महिने उलटले आहेत. तरीही राज्यातील काही जिल्ह्यांत दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे टँकरची संख्या जुलैअखेरीस वाढली आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Pune News : पावसाचे तब्बल दोन महिने उलटले आहेत. तरीही राज्यातील काही जिल्ह्यांत दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे टँकरची संख्या जुलैअखेरीस वाढली आहे. सध्या राज्यात ३४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

यंदा जूनमध्ये पुरेसा पाऊण न झाल्याने ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई वाढली होती. २६ जूनच्या दरम्यान राज्यात ६१६ गावे व १७१५ वाड्या-वस्त्यांवर ४८४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. दरम्यान पावसाने सुरवात केली. कोकण, विदर्भ, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील टॅंकरची संख्या कमी झाली. मात्र इतर भागांत अजूनही पुरेसा पाऊस नाही.

Water Shortage
Water Crisis : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात भर पावसाळ्यात टँकर सुरूच

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी पावसामुळे टॅंकरची संख्या १७५ ने कमी होऊन ती ३०९ पर्यंत खाली आली होती. त्यातच पावसाने पुन्हा जोर धरल्याने या टँकरच्या संख्येत आणखी घट होईल, असा विश्वास जलसंपदा विभागाला होता.

परंतु काही जिल्ह्यांत पाऊस न पडल्याने टॅंकरच्या संख्येत पुन्हा ३६ ने वाढ झाली आहे. सध्या राज्यातील ३५१ गावे व १०९७ वाड्या-वस्त्यांवर ३४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी याच काळात राज्यातील ७७ गावे व १७० वाड्या-वस्त्यांवर अवघ्या ७१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.

कोकणात दमदार पावसामुळे या भागातील टॅंकरची संख्या घटली आहे. खानदेशात ६० ते ८० टक्के दरम्यान पाऊस पडला आहे. नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर या जिल्ह्यांत पाऊस कमी आहे.

त्यामुळे या भागातील टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा जिल्हा वगळता सर्वच भागात शंभर टक्केहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे या भागातील टॅंकरच्या संख्येत घट झाली आहे.

Water Shortage
Nandurbar Water Crisis : टंचाईस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास प्राधान्य

खानदेशातील नाशिक, नगर, जळगाव जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर धुळे जिल्ह्यात एक टॅंकर सुरू आहे. पुणे विभागात सातारा, पुणे जिल्ह्यांत टॅंकरची संख्या अधिक आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात जवळपास ४३ टॅंकर सुरू आहेत. अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातही नऊ टॅंकर सुरू आहेत.

जिल्हानिहाय गावे आणि वाड्या-वस्त्यांनिहाय टॅंकरची संख्या :

जिल्हा---गावे---वाड्यावस्त्या---टॅंकर

नाशिक---६७---३९ ---५६

धुळे---१---० ---१

जळगाव ---३५---०---३६

नगर---५९---३४८---५४

पुणे---४३---२०८---२६

सातारा---४८---२७१---४९

सांगली---१९---१३५---२१

सोलापूर---९---७४---९

छत्रपती संभाजीनगर---२८---४---३५

जालना---२७ ---१८---४३

बुलडाणा--- ९---०---९

यवतमाळ---६---०---६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com