Nagpur Orange Agrowon
ताज्या बातम्या

Nagpur Orange : अडीचशे नागपुरी संत्रा उत्पादकांनी केली वैयक्‍तिक ‘जीआय’ नोंदणी

भौगोलिक मानांकनासाठी आवश्‍यक प्रक्रियेला प्रतिसाद

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः चव, रंग आणि इतर गुणवैशिष्ट्ये जपणाऱ्या नागपुरी संत्र्याचे (Nagpur Orange) भौगोलिक मानांकन (Geographical Index) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मिळाले आहे. मात्र त्यानंतर वैयक्‍तिक प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता; विद्यापीठही याबाबत उदासीन होते.

अखेरीस कृषी तसेच पणन विभागाने या संदर्भाने मोहीम उघडत केलेल्या प्रयत्नांती नागपुरी संत्रा उत्पादक २५० शेतकऱ्यांनी वैयक्‍तिक प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोंदणी केली आहे.

यामुळे या शेतकऱ्यांना या पीकवाणांची लागवड, विक्री करणे सुलभ होणार आहे.

राजे रघुजी भोसले हे दक्षिणेतील स्वारीवर असताना त्यांना या काळात त्या भागातील राज्यांनी संत्रा रोपे भेट दिली होती. या रोपांची लागवड राजे रघुजी भोसले यांनी नागपूरला परतल्यावर केली असता या भागातील वातावरण आणि मातीत ती चांगल्या प्रकारे रुजली.

त्याला आंबट-गोड चवीची फळेही लागली. हाच संत्रा पुढे नागपुरी संत्रा म्हणून नावारूपास आला. नागपुरी संत्र्याची लागवड महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांसोबतच लगतच्या मध्य प्रदेश व राजस्थानमध्येही मोठ्या प्रमाणावर होते.

त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या वाणाच्या भौगोलिक मानांकनाचा प्रस्ताव सादर केला होता.

उद्यानविद्या विभागाचे डॉ. प्रकाश नागरे, शशांक भराड यांच्या नेतृत्वात हे काम तडीस गेले. दरम्यान, भौगोलिक निर्देशांक (जीआय) वापराकरिता शेतकऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र आवश्‍यक राहते.

मात्र याविषयी जागृती आणि माहितीचा अभाव असल्याने शेतकरी वैयक्‍तिकस्तरावर नोंदणीकरिता पुढे येत नव्हते.

भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतरही वैयक्‍तिक नोंदणीची प्रक्रिया रखडल्याने त्याचा काही एक उपयोग होणार नव्हता. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून नागपूर येथे कार्यशाळा घेण्यात आली.

त्याच्याच परिणामी आधी शून्यावर असलेली ही नोंदणी आता २५० च्या घरात पोहोचली आहे. याचा उत्पादन, विक्रीकरिता लाभ घेता येतो व दहा वर्षांकरिता हे ग्राह्य ठरते.



भौगोलिक निर्देशांक असलेल्या शेतीमालाचे उत्पादन घेण्यासाठी त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना वैयक्‍तिक नोंदणीची गरज राहते.

त्याकरिता नाममात्र दहा रुपये शुल्क आकारले जाते. नागपुरी संत्रा उत्पादकांनी सुरुवातीला याला प्रतिसाद दिला नाही.

जागृतीनंतर २५० शेतकऱ्यांनी वैयक्‍तिक नोंदणी केली आहे. त्यांना नागपुरी संत्रा लोगो मार्केटिंगच्या वेळी वापरता येणार आहे.
- गोविंद हांडे,
निर्यात सल्लागार, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT