Mango Export Agrowon
ताज्या बातम्या

Mango Export : राज्यातून अडीच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट

महाराष्ट्रातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून परकीय चलन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आंबा निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जाते.

गणेश कोरे

पुणे ः महाराष्ट्रातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना (Mango Farmers) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून परकीय चलन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आंबा निर्यातीसाठी (Mango Export) प्रोत्साहन दिले जाते.

यावर्षी देखील आंबा निर्यातीचे नियोजन करण्यात आले असून, नव्याने अर्जेंटिना देशात आंबा निर्यात खुली होणार असून, अमेरिकेसह विविध देशांमध्ये सुमारे अडीच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्रातील आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी विविध देशांच्या मागणीनुसार विविध आंबा निर्यात प्रक्रिया केली जाते. यासाठीचे विविध देशांचे प्रोटोकॉल तयार करण्यात येतात.

या प्रोटोकॉलनुसार विविध यंत्रणा नवी मुंबई येथील वाशी या आणि जालना येथील निर्यात सुविधा केंद्रांवर राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाभा अणू संशोधन केंद्रांच्या तांत्रिक सहकार्याने विकिरण आणि उष्ण जल प्रक्रियेचा समावेश आहे.

न्यूझीलंडमध्ये फेब्रुवारीत; अमेरिका एप्रिलमध्ये निर्यात

न्यूझिलंड देशाच्या निर्यातीसाठीच्या प्रोटोकॉलची तपासणी केंद्र सरकार आणि न्यूझीलंडचे इन्स्पेक्टर यांच्याद्वारे १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

तर अमेरिकेसह जपान आणि दक्षिण आफ्रिकेचे इन्स्पेक्टर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात दाखल होणार असून, ते सर्व सुविधांची पाहणी करून निर्यातीला प्रारंभ होईल, असेही दीपक शिंदे यांनी सांगितले.

अमेरिकेला समुद्र मार्गे निर्यात यशस्वी

निर्यातीचा विमान मार्गे होणारा खर्च कमी करण्यासाठी पणन मंडळाने गेल्यावर्षी अमेरिकेला समुद्रमार्गे निर्यात करण्यासाठीचे प्रोटोकॉल तयार केले.

या प्रोटोकॉलनुसार आंबा समुद्रमार्गे सुस्थितीतील पोचल्यानंतर आता या वर्षी जास्तीत जास्त निर्यातदार समुद्रमार्गे आंबा निर्यातीसाठी प्रयत्नशील असल्याचे शिंदे यांनी सांगितले. निर्यातदारांच्या मागणीनुसार प्रक्रिया सुविधांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न पणन मंडळाचे असल्याचेही ते म्हणाले.

असे आहे विविध देशांतील निर्यात नियोजन

देश --- आणि निर्यात उद्दिष्ट (टन)

युरोपियन देश - १ हजार ५० टन

अमेरिका --- ७००

मलेशिया --- ५०

जपान ---५०

दक्षिण कोरिया --- ५०

न्यूझीलंड --- ५०

ऑस्ट्रेलिया ---२००

रशिया, मॉरेशिअस, अर्जेंटिना --- १००

आखाती देश --- ३५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT