Rain Agrowon
ताज्या बातम्या

Khandesh Rain : खानदेशात सरासरीच्या २५ टक्के पाऊस

Khandesh Monsoon Update : खानदेशात सरासरीच्या एकूण २५ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागात कमी पाऊस आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सरासरीच्या एकूण २५ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागात कमी पाऊस आहे. तसेच धुळ्यातही शिंदखेडा तालुक्यातील काही भागांत पाऊसमान कमी आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) एकूण ६३२ मिलीमीटर पाऊस पडतो. यात एकूण २३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. अर्थात, एकूण पाऊसमानातील सरासरीच्या ३६ टक्के पाऊस जळगाव जिल्ह्यात झाला आहे.

धुळ्यात पावसाळ्यात एकूण ५७५ मिलिमीटर आणि नंदुरबारात सुमारे ६०० मिलिमीटर पाऊस पडतो. नंदुरबारात मात्र एकूण पावसातील सरासरीच्या २४ टक्के आणि धुळ्यात एकूण सरासरीच्या २२ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात कमी पाऊस आहे. फक्त मध्यम, भीज पाऊस मागील तीन -चार दिवसांत झाला आहे.

धुळ्यात साक्री तालुक्यातील पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. परंतु शिंदखेडा, धुळ्याचा पूर्व भागात कमी पाऊस आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, पारोळा, जळगाव, धरणगाव या भागांतही भीज स्वरूपातील पाऊस अधिक झाला आहे.

परंतु मागील काही दिवसांत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर व यावल भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. बुधवारी (ता. १९) यावल, रावेर व मुक्ताईनगरातील १६ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे.

जून महिन्यात सरासरीच्या फक्त पाच टक्के पाऊस जळगाव, धुळे जिल्ह्यात झाला होता. परंतु या महिन्यात पावसातील तूट भरून निघू शकते, अशी स्थिती आहे.

बुधवारचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव जिल्हा - यावल ९१, रावेर १३०, मुक्ताईनगर ७९. नंदुरबार - तळोदा ३७, नवापूर ३५. धुळे जिल्हा साक्री - ३६.. गुरुवारी (ता. २०) खानदेशातील अनेक भागांत तुरळक, मध्यम पाऊस झाला. अनेक भागांत पाऊसच नव्हता.

शेतीकामे ठप्प

या आठवड्यात पाऊसमान बरे आहे. जळगावात हतनूर, मंगरूळ, अभोरा, सुकी, मोर, गूळ आदी विविध प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परंतु शेतीकामे ठप्प आहेत. तणनियंत्रण, फवारणीची कामे शेतकरी घेवू शकत नाही. तण कापूस, केळी व इतर पिकांत वाढत आहे.

यामुळे पुढे तणनाशकांचा उपयोग शेतकरी करतील, असेही दिसत आहे. परंतु अनेकांनी गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत असल्याने खते देण्याचे काम पूर्ण केले. यावल, रावेरात अनेक शेतांत पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी तुंबले आहे. यामुळे कापूस पिकात मर रोगाची समस्या तयार होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway : कोल्हापुरात एक टक्काही शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन नाही

Lumpy Skin Disease : विळखा घातक ‘लम्पी’चा!

Ujani Dam Water Release : 'उजनी'तून 'भीमे'त २० हजाराचा विसर्ग

Plastic Flower Ban : प्लॅस्टिक फूल विक्रीवर शासनाने बंदी घालावी

Urea Shortage : युरीया बनला विक्रेत्यांचीही डोकेदुखी

SCROLL FOR NEXT