Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural Assistants Recruitment : कृषी सहायकांची १९१ पदे रिक्त

Agriculture Department : एकूण १ हजार ५१ पदे मंजूर असताना, केवळ ५२६ पदे भरली आहेत. ५४५ पदे म्हणजेच अर्धा विभागच रिक्त आहे. काही भागांत तालुका कृषी अधिकारीच नाही.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Agricultural Assistants Post : जळगाव ः खरीप हंगामात (Kharif season) कृषी विभाग महत्त्वपूर्ण काम करतो. मात्र काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात कृषी विभाग निम्मा रिकामा आहे.

एकूण १ हजार ५१ पदे मंजूर असताना, केवळ ५२६ पदे भरली आहेत. ५४५ पदे म्हणजेच अर्धा विभागच रिक्त आहे. काही भागांत तालुका कृषी अधिकारीच नाही.

१९१ पदे कृषिसेवक, कृषी सहायकांची रिक्त आहेत. यामुळे कृषी विभाग सलाइनवर असल्याचे चित्र आहे.

खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर अतिवृष्टी झाल्यास पंचनामे करण्यास कृषी सहायक, कृषिसेवकांची गरज भासते.

खत, बियाण्यांच्या काळ्या बाजारावर ते लक्ष ठेवतात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन वा अन्य मदतीला हेच पुढे असतात.

ग्लोबल वार्मिंगमुळे आता हिवाळा, उन्हाळ्यातही अतिवृष्टी होते. त्या नुकसानीचे पंचनामे करण्यास लागलीच त्यांना कंबर कसावी लागते. तेव्हा कोठे पंचनाम लवकर होतात.

गतवर्षी अनेक वेळा अतिवृष्टी झाली होती. अपुऱ्या कृषी सहायक, सेवकांमुळे पंचनाम्यांना उशिर झाला होता. परिणामी, उशिरा शेतकऱ्यांच्या हातात मदत आली.

तालुक्यात कृषीच्या नवीन व जुन्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी, तालुक्यातील शेतकऱ्याच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती असते.

मात्र जिल्ह्यात पंधरापैकी दहा तालुक्यांत तालुका कृषी अधिकारीच असल्याचे विदारक चित्र आहे. सर्व ठिकाणी प्रभारीराज सुरू आहे.

कृषी विभागातील रिक्त पदांचा तपशील
संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे

कृषी पर्यवेक्षक १११ ६१ ५०
अधीक्षक २ १ १
कृषी सहायक/सेवक ४९५ ३०४ १९१
वरिष्ठ लिपिक ७२ ३१ ४१
अनुरेखक ८० ७ ७३
वाहनचालक २१ ७ १४
रोपमळा मदतनीस २० २ १८
श्रेणी १ मजूर २५ १ २४
शिपाई ९६ ४२ ५४
पहारेकरी १४ ७ ७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT