Agriculture University
Agriculture University Agrowon

Agriculture University Recruitment : कृषी विद्यापीठातील रिक्त पदांची भरती करावी

Agriculture University वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदांची भरती करावी. एमसीएआर अंतर्गत सरळ सेवा भरतीने पदे भरावीत.
Published on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदांची भरती करावी. एमसीएआर अंतर्गत सरळ सेवा भरतीने पदे भरावीत. कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, आदी मागण्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कर्मचारी संघातर्फे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडे स्वतःच्या पदभारा व्यतिरिक्त इतर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. त्यामुळे नवीन पदाकरिता तत्काळ पद भरती करण्यात यावी.

Agriculture University
Agriculture Warehouse : गोदाम उभारणीपुर्वी नियोजन आवश्यक

संपूर्ण राज्यात लागू असलेली, परंतु केवळ कृषी विद्यापीठास लागू नसलेली आश्‍वासित प्रगती योजना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विद्यापीठास लागू करावी. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी.

Agriculture University
Agriculture Irrigation : खडकवासला धरणातून शेतीसाठी १५ जूनपर्यंत आवर्तन

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे अंतर्गत प्राध्यापक व त्यावरची पदे सरळसेवा तथा ज्येष्ठता पद्धतीने भरती करण्यात यावी. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील वाढीव प्रमाणानुसार पदोन्नत्या देण्यात याव्यात.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात परभणी येथे विशेष बाब म्हणून सेवेत नियमित केलेल्या कुशल अर्धकुशल कर्मचाऱ्यांना कुटुंब वेतन, निवृत्ती वेतन व इतर आनुषंगिक लाभ मंजूर करण्यात यावे आदी मागण्या कृषी विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष महेश देशमुख, सरचिटणीस डॉ. रमेश पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com