Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : विजेची तार तुटल्याने १५ एकर उसाला आग

महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका; शेतकऱ्यांचा आरोप

Team Agrowon

चिंचखेड, ता. दिंडोरी : नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड येथे गुरुवारी (ता. २७) दुपारी अडीचच्या सुमारास शिवारातील गट नं. ११० येथे शेतावरून महावितरणची मुख्य विद्युतवाहिनी गेली आहे. येथील तारा तुटल्याने झालेल्या घर्षणामुळे आग लागून सुमारे १५ एकर आडसाली ऊस (Sugarcane Crop) जळून खाक झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

घटनास्थळी पिंपळगाव येथील अग्निशामक दल पोहोचल्यानंतर आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला असल्याचे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या मध्ये दौलत मुरलीधर संधान, भाऊसाहेब रघुनाथ पाटील, प्रभाकर रघुनाथ पाटील, चंद्रभागा रंगनाथ मोरे, सुमनबाई राजाराम पाटील, सदाशिव राजाराम पाटील, सोमनाथ राजाराम पाटील, पंढरीनाथ राजाराम संधान यांचे ऊस क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

महसूल विभागाच्या वतीने तलाठी श्री. शेख यांनी निवृत्ती नामदेव मातेरे, सुनील शिवाजी मातेरे, संदीप परसराम जगताप, शाम दिनकर जाधव, गुणवंत मोतीराम पाटील, कैलास पंढरीनाथ संधान, काशिनाथ मुरलीधर संधान, आदेश दत्तात्रय मातेरे या पंचांसमोर शुक्रवारी (ता. २८) पंचनामा केला. तत्काळ भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

उसाशेजरी शेतीसाहित्यासह द्राक्ष बागेचे नुकसान उसाच्या क्षेत्राशेजारी खंडेराव फुकट यांच्या गट नं. १०८ मधील द्राक्ष बागेचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची दाहकता अधिक असल्याने ठिबक सिंचन नळ्या व द्राक्ष वेलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

प्रतिक्रिया
१९६० दरम्यान उभारलेले खांब व विद्युततारा आजपर्यंत बदललेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रकार घडला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तार तुटून पडल्याने जळीत झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- प्रभाकर पाटील, माजी अध्यक्ष-कादवा सहकारी साखर कारखाना

महावितरणच्या अधिकाऱ्यांना या नुकसानीबाबत कळविले आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. कामकाजाच्या दुर्लक्षामुळे वारंवार असे प्रकार घडत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत नुकसान भरपाई द्यावी व सदोष काम दुरुस्त करावे.
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT