टीम ॲग्रोवन
जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची चाके फिरू लागली आहेत. खानदेशात धुळे, शिरपूर, शहादा, जळगावमधील जामनेर, बोदवड, पारोळा, एरंडोल, धरणगाव या ठिकाणी जिनिंग मिल्स सुरू झाल्या आहेत.
खानदेशात सुमारे १५३ जिनिंग प्रेसिंग मिल्स आहेत. या मिल्सच्या यंत्राची चाके फेब्रुवारी २०२१ पासून बंद झाली होती. कापसाची आवक विजयादशमीपासून सुरू झाली.
अत्यल्प कापसाने केवळ चार महिने जिनिंग प्रेसिंगचा हंगाम सुरू होता. कापसाअभावी फेब्रुवारीपासून जिनिंग बंद करण्याची वेळ जिनिंगचालकांवर आली होती. यामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा जिनिंगचालकांना सहन करावा लागला होता.
अनेक ठिकाणी कापसाचे उत्पादन हाती आले आहे. आगामी काळातही कापसाची टंचाई नसेल. गेल्या वर्षी १३ हजारांपर्यंत प्रतिक्विंटलला मिळालेला दर पाहता, यंदा कापसाचा पेरा ११० टक्के झाला आहे.
कापूस पिकावर सध्यातरी कोणत्याही प्रकारचा रोग नाही (बोंड अळी वगैरे), आतापर्यंत जो कापूस आलेला आहे, त्याचा दर्जा उत्तम आहे. याचा परिणाम चांगल्या प्रकारचा, मोठ्या प्रमाणात कापूस बाजारात येणार आहे
दर वर्षी १५ ते १६ लाख गाठी जिल्ह्यात तयार होतात. गेल्या वर्षी कापसाअभावी केवळ नऊ लाख गाठींची निर्मिती झाली होती.
यंदा मात्र कापसाचे उत्पादन अधिक असल्याने २५ लाख गाठींची निर्मिती करता येईल.
जिनिंग प्रेसिंग यंत्रेही जून-जुलैपर्यंत सुरू राहू शकतील. अनेकांना त्यातून रोजगार मिळेल.