Water Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Water Project : नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पास १०८ कोटींचा निधी

रखडलेल्या नाधवडे (ता. वैभववाडी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती मिळावी यासाठी जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) १०७.९९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता दिली आहे.

Anil Jadhao 

सिंधुदुर्गनगरी ः रखडलेल्या नाधवडे (ता. वैभववाडी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती मिळावी यासाठी जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) १०७.९९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

तळेरे-वैभववाडी महामार्गालगतच नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाला १९९५ मध्ये ७ कोटी ९५ लाख रुपये निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली. २००५ मध्ये या कामाला गती मिळावी म्हणून पुन्हा १२ कोटी ९५ लाखांची सुधारित मान्यता मिळाली होती.

गेली २७ वर्षे सुरू असलेले काम अद्याप रेंगाळलेले आहे. या प्रकल्पांची घळभरणी झालेली आहे. प्रकल्पांमध्ये ०.२९ टीएमसी पाणीसाठा सद्यःस्थितीत होतो. परंतु कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. दरम्यान शासनाने आता या प्रकल्पाच्या सुधारित खर्चास १०७ कोटी ९९ लाख रुपयांची मान्यता दिली आहे. प्रकल्पाचे आतापर्यंत अंदाजे ५० कोटींचे काम झाले आहे. सध्या प्रकल्पाची उंची २४.७५ मी. आहे. ती ३०.७५ मीटरवर नेली जाणार आहे.

रब्बीतील शेतीला चालना मिळणार

या प्रकल्पात सध्या ०.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. उंची वाढविल्यानंतर त्यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नाधवडे परिसरातील ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या भागात ऊसशेतीसह अन्य रब्बी हंगामातील शेतीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

नाधवडे प्रकल्पाला १०७ कोटी ९९ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता मिळाली आहे. या निधीतून प्रकल्पांची उंची वाढविणे, कालव्यांची कामे करणे, अशी कामे केली जाणार आहेत. प्रकल्पामुळे ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

- महेश हिरेगौडर, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कणकवली.

शासनाने प्रकल्पासाठी निधी मंजूर केला असला तरी जोपर्यंत कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उंची वाढविण्याचे काम सुरू होऊ देणार नाही. हीच स्थानिकांची भूमिका आहे.

- सुधीर नकाशे, माजी जिल्हा परिषद सदस्य, नाधवडे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT