ताज्या बातम्या

Rural Development : ग्रामविकासासाठी सरसावल्या १०० सामाजिक, औद्योगिक संस्था

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने काम करू इच्छिणाऱ्या सामाजिक संस्थांनी पुढे येत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर यासंदर्भात नोंदणी करावी,

Team Agrowon

नाशिक : जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Nashik ) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ग्रामीण भागात (Rural Development) स्वयंस्फूर्तीने काम करू इच्छिणाऱ्या सामाजिक संस्थांनी पुढे येत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर यासंदर्भात नोंदणी करावी, असे आवाहन केले होते. यास चांगला प्रतिसाद मिळाला असून, ७५ सामाजिक व २५ औद्योगिक संस्था ग्रामीण भागात काम करण्यास सरसावल्या आहेत.

जिल्हा परिषदेतर्फे सामाजिक संस्था आणि औद्योगिक संस्था यांची संयुक्त बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणा कटिबद्ध आहे. जिल्ह्याचा विस्तार बघता नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात काम करण्यासाठी इच्छुक असतात.

अशा संस्थांनी पुढील काळात जिल्हा परिषदेसोबत काम करावे. उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांची नोंद घेण्यात येऊन राष्ट्रीय सणांच्या वेळी अशा संस्थांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात येणार असल्याचे मित्तल यांनी या वेळी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी जिल्हा परिषदेबद्दल माहिती देऊन या आधी जिल्हा परिषदेसोबत काम केलेल्या संस्था व त्यांच्या कामांबद्दल माहिती देत सामाजिक संस्थांना सर्वच विभागांमध्ये काम करण्यास वाव असल्याचे सांगितले.

बैठकीत जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांनी आपल्या विभागांबद्दल माहिती देत सामाजिक संस्थांना आपल्या विभागाशी निगडित कुठे काम करण्याची संधी आहे, याबद्दल सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी आपापल्या विभागांबद्दल माहिती दिली.

त्याचबरोबर सामाजिक व औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींनीदेखील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या संकल्पना मांडल्या. या बैठकीस ७५ सामाजिक संस्था व २५ औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या वेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT