Flower Farming : शेतकरी नियोजन - फुलशेती

पुणे जिल्ह्यातील जगन्नाथ हिंगणे (रा. बारामती) यांची २२ एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, पेरू, केसर आंबा, पेरू, शेवगा आदी पिकांची लागवड आहे. मुख्य पिकामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून विविध फुलांची लागवड केली आहे. त्यात बिजली. शेवंती, झेंडू इत्यादी लागवड आहे.
Flower Farming
Flower FarmingAgrowon

शेतकरी ः जगन्नाथ हिंगणे

गाव ः बारामती, जि. पुणे

एकूण शेती ः २२ एकर

शोभिवंत सूर्यफूल ः १ ते दीड एकर

पुणे जिल्ह्यातील जगन्नाथ हिंगणे (रा. बारामती) यांची २२ एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, पेरू, केसर आंबा (Mango), पेरू, शेवगा आदी पिकांची लागवड आहे. मुख्य पिकामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून विविध फुलांची लागवड (Flower Cultivation) केली आहे. त्यात बिजली. शेवंती, झेंडू इत्यादी लागवड (marigold Cultivation) आहे. केसर आंब्याची १ एकरावर घन पद्धतीने ८०० झाडे, पेरूच्या चार जातींची ७ एकरांवर ६००० झाडांची फळबाग लागवड आहे. तसेच ३ एकरांवर ऊस आणि ४ एकरांत शेवगा लागवड आहे.

मागील दीड वर्षापासून त्यांनी शोभिवंत सूर्यफूल लागवडीस सुरुवात केली आहे. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर अर्धा एकरावर शोभिवंत सूर्यफूल लागवड केली. दोन ते अडीच महिन्यांच्या हंगामात त्यांना सुमारे १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून त्यांनी लागवड क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

Flower Farming
Flower Farming : पुष्पोत्पादनाला मिळणार 'बुस्टर'

शोभिवंत सूर्यफूल साधारण ५५ ते ६५ दिवसांत काढणीस तयार होतात. विविध सणवारांचा अंदाज घेऊन दीड ते दोन महिने अगोदर १० ते १५ दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन केले जाते. जेणेकरून फुले काढणीस टप्प्याटप्प्यात करता येईल. वर्षातून साधारण १० ते १२ वेळा लागवडीचे नियोजन केले जाते. एक गुंठे क्षेत्रावर लागवडीसाठी साधारण १ हजार बिया आवश्यक असतात. शोभिवंत सुर्यफुलाच्या एका झाडाला एकच फूल येते.

Flower Farming
Flower Farming : फुलांच्या शेतीतून अकोळनेरला मिळाली ओळख

लागवड नियोजन

साधारण एक ते दीड एकरावर शोभिवंत सूर्यफुलांची लागवड केली जाते. लागवड नियोजनानुसार जमिनीची चांगली पूर्वमशागत केली जाते.

त्यानंतर शेणखत आणि १०ः२६ः२६ हे रासायनिक खत ५० ते ७५ किलो प्रति अर्धा एकर प्रमाण दिले जाते.

Flower Farming
Flower Farming : फुलशेतीच्या बळावर फुलवला संसार

लागवड सरी वरंबा पद्धतीने केली जाते. त्यासाठी ट्रॅक्टरचलित यंत्राने तीन फुटांच्या सऱ्या पाडून घेतल्या जातात. त्यानंतर तीन फुटांच्या सरीच्या दोन्ही बाजूस ९ इंच अंतरावर बियांची टोकण केली जाते.

लागवडीनंतर लगेच पाटपाणी पद्धतीने पाणी दिले.

साधारण ८ व्या दिवशी रोपांची उगवण होते. उगवणीनंतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जाते.

दर ५ ते ७ दिवसांनी जमिनीतील ओलावा पाहून पाटपाणी दिले जाते.

लागवडीनंतर साधारण दीड महिन्याने झाडांना कळीधारणा होण्यास सुरुवात होते.

कळीवर विविध किडींचा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव आढळल्यास एक फवारणी घेतली जाते.

कळी अवस्थेत फुलकिडे, रसशोषक किडी, करपा रोग इत्यादी कीड-रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार फवारणी केली जाते.

कळी अवस्थेमध्ये पिकास १०ः२६ः२६ या खतांची मात्रा दिली जाते.

कळीधारणा झाल्यानंतर साधारण ८ दिवसांनी फूल तयार होते. टप्प्याटप्प्याने लागवड केल्याने फुले काढणीस

...असे आहे उत्पादन

शोभिवंत सूर्यफुलाच्या एका झाडाला एकच फूल येते. एका फुलाला सरासरी १० ते २५ रुपये दर मिळतो. बाजारात शोभिवंत सूर्यफुलाची जास्त आवक झाल्यास दर १० रुपये प्रति फूल इतका कमी होतो. त्यासाठी बाजारातील मागणी आणि दरांचा अंदाज घेऊन विक्रीसाठी बाजारपेठेची निवड केली जाते.

विक्रीसाठी दर्जेदार पॅकिंग

शोभिवंत सूर्यफुलांची विक्री पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दादर येथील फूल बाजारात केली जाते. विक्रीसाठी ६ फुलांचा एक बंडल तर फुलांच्या ५ बंडलचा एक मोठा बंडल याप्रमाणे पॅकिंग केली जाते. फुलांच्या पाकळ्यांच्या संरक्षणासाठी दांड्यावर फुलाच्या बाजूने प्लॅस्टिकचे वेस्टण लावले जाते. योग्यप्रकारे पॅकिंग केल्यामुळे फुलांचा दर्जा उत्तम राहून विक्रीवेळी चांगले दर मिळत असल्याचे जगन्नाथराव सांगतात.

- जगन्नाथ हिंगणे, ९८२२७५०००७, (शब्दांकन ः गणेश कोरे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com