Flower Farming : पुष्पोत्पादनाला मिळणार 'बुस्टर'

Mahesh Gaikwad

शेतकऱ्यांना फळे-भाजीपाल्यांशइवाय इतर कृषी उत्पादनांचा प्रभावी पर्याय मिळावा, यासाठी केंद्र सरकार पुष्पोत्पादनाला प्रोत्साहन देत आहे.

या योजनेत विविध फुलांच्या नवनवीन वाणांचे संशोधन, विकास, प्रक्रिया आणि निर्यातीवर भर देण्यात येणार आहे. तसेच यासाठी क्लस्टरनिहाय विकास केला जाणार आहे.

या संदर्भातील माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी दिली.

देशात वाढणाऱ्या फुलशेतीच्या विकासाठी पंचवार्षिक योजना आखली जात असून यासाठी क्लस्टरनिहाय विकास केला जाणार असल्याचे लिखी म्हणाले.

धार्मिक आणि घरगुती वापरासाठी फुलांचा वापर राहिला नसून सजावटीसह उद्योग म्हणूनही फुलांचा वापर वाढला आहे.

दिवसेंदिवस विविध फुलांना मागणी वाढत आहे. निर्यातीसाठी देखील मागणी होत आहे.

यासाठी विविध सजावटीच्या, सुगंधाच्या आणि नैसर्गिक रंगाच्या फुलांच्या वाणांच्या संशोधनाचे काम संचालनालयाद्वारे सुरू आहे.