Chana Cultivation : शेतकरी नियोजन पीक ः हरभरा

बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा परिसरातील शेतकरी सुधारित पद्धतीने हरभरा पिकाची लागवड करण्यास प्राधान्य देतात.
Chana Cultivation
Chana CultivationAgrowon
Published on
Updated on

शेतकरी ः विनोद देशमुख

गाव ः सवडद, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

एकूण क्षेत्र ः २० एकर

हरभरा ः १३ एकर

बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याची (Rabi Chana) मोठ्या प्रमाणात लागवड होते. सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा परिसरातील शेतकरी सुधारित पद्धतीने हरभरा पिकाची लागवड (Chana Cultivation) करण्यास प्राधान्य देतात. सवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद देशमुख हे दरवर्षी हरभऱ्याच्या विविध वाणांची लागवड करतात. उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवून अधिक उत्पादन (Chana Production) मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकरी साधारण १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. मागील ७ वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते हरभरा उत्पादन घेत आहेत.

Chana Cultivation
Chana Rate : हरभरा दर वाढणार का ?

लागवड नियोजन

मागील हंगामात संपूर्ण क्षेत्रामध्ये सोयाबीन आणि तूर लागवड केली होती. त्यातील सोयाबीन लागवडीत या हंगामात हरभरा लागवडीचे नियोजन त्यांनी केले आहे.

या वर्षी परतीच्या मॉन्सूनचा पाऊस अधिक झाल्याने जमिनीत वाफसा येण्यास विलंब झाला. शेतामध्ये अधिक प्रमाणात ओलावा असल्याने आंतरमशागतीचे कामे करण्यास अडचणी आल्या. परिणामी लागवडीस उशीर झाला. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन मशागतीच्या कामांचे आणि पेरणीचे नियोजन केले.

Chana Cultivation
Chana Sowing : दर दबावात असूनही हरभरा पेरणी वाढली

साधारण ३ एकर क्षेत्र बऱ्यापैकी सुके होते, तेथे सोयाबीन काढणीनंतर ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची मशागत करून पेरणी केली. सहा एकर क्षेत्रात थोडी ओल असल्याने तेथे हलकी मशागत आणि उर्वरित साडेतीन एकर क्षेत्र पूर्ण ओले असल्याने तेथे विनामशागत पेरणीचे नियोजन केले.

साधारण १३ एकरांवरील हरभरा पेरणी टप्प्याटप्प्याने १०, १४ आणि १६ नोव्हेंबर या काळात पूर्ण करण्यात आली. संपूर्ण पेरणी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे करण्यात आली.

पट्टापेर पद्धतीने दोन ओळींत साधारण १४ इंच आणि दोन झाडांत ३ ते ४ इंच अंतर राखत पेरणी केली आहे. प्रत्येक सहा ओळींनंतर १ ओळ रिकामी राखली आहे.

पेरणीसाठी विविध गुण वैशिष्ट्ये असलेल्या ५ वाणांची निवड केली. पेरणीपूर्वी बियाण्यास जैविक आणि रासायनिक बीजप्रक्रिया केली.

पेरणीवेळी ८ः२१ः२१ या खताची एकरी ६० किलो प्रमाणे मात्रा दिली. हे खत हळूहळू विरघळून वाढीच्या अवस्थेनुसार पिकास उपलब्ध होते.

संपूर्ण लागवडीत सिंचनासाठी स्प्रिंकलर पद्धतीचा अवलंब केला आहे. पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी साधारण २ तास सिंचन केले. एवढ्या सिंचनावर पिकाची उगवण होते, असा त्यांचा अनुभव आहे.

तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी केली.

Chana Cultivation
Kabuli Chana Rate : काबुली हरभरा तेजीतच राहणार

आगामी नियोजन

पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी पीक चार पानांवर आल्यानंतर पाने आणि खोडाच्या कोवळ्या भागावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी केली जाईल. सोबतच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशकांची फवारणी केली जाईल. फांद्याच्या योग्य वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि १९ः१९ः१९ ची एक फवारणी घेणार आहे. पीक २५ दिवसांचे झाल्यानंतर दुसरे पाणी दिले जाईल. आवश्यकतेनुसार कोळपणी करून तणनियंत्रण केले जाईल.

वैशिष्ट्यांनुसार वाण निवड

या वर्षी १३ एकरांवर लागवड नियोजन केले, त्यानुसार लागवडीसाठी ५ वाणांची निवड केली आहे. त्यात पीडीकेव्ही कनक, आरव्हीजी २०४, जेजी २४ , फुले विश्वराज आणि पुसा मानव हे वाण आहेत.

चार एकरांत पीडीकेव्ही कनक या वाणाची लागवड केली. हा वाण घाटे अळीस प्रतिकारकक्षम असून, उत्पादनक्षमता देखील अधिक आहे. तसेच यंत्राद्वारे काढणी करता येते. पेरणीसाठी ३१ ते ३२ किलो बियाणे लागले.

तीन एकरांत आरव्हीजी २०४ वाणाची लागवड आहे. इतर वाणांच्या तुलनेत या वाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. घाटे संख्या अधिक असल्याने उत्पादनही चांगले मिळते. पेरणीसाठी ३० ते ३२ किलो बियाणे लागले.

जेजी २४ हा वाण दोन एकरांत आहे. हा वाण उंच वाढतो. या वाणाच्या दाण्याचा आकार मोठा असून, वजनही जास्त भरते. दोन दाण्यांची संख्या अधिक आहे. यंत्राद्वारे काढणी करता येते. पेरणीसाठी साधारण ३५ किलो बियाणे लागले.

फुले विश्‍वराज हा कमी सिंचनामध्ये अधिक उत्पादन देणारा वाण आहे. पेरणीसाठी साधारण ३२ किलो बियाणे लागले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) ‘पुसा मानव’ हे नवीन वाण विकसित केले आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार यंदा प्रथमच या वाणाची प्रात्यक्षिक प्लॉट म्हणून टोकण पद्धतीने लागवड केली आहे. साधारण ५०० ग्रॅम बियाणे दिल्लीतील तज्ज्ञांनी पोस्टाद्वारे पाठवून दिले आहे. दोन ओळींत १६ इंच, तर दोन बियाण्यांत २ ते ३ इंच अंतर राखत बियाणाची टोकण केली आहे. प्रत्येक २ ओळींनंतर १ ओळ रिकामी ठेवली आहे.

- विनोद देशमुख,

९४२१३९६३४१

(शब्दांकन ः गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com