Chana Rate : हरभरा दर वाढणार का ?

नाफेड मागील काही महिन्यांपासून सातत्याने हरभऱ्याची खुल्या बाजारात विक्री करत आहे. त्यामुळं नाफेडकडील साठा कमी झाला आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये नाफेडकडील साठा १० लाख टनांवर येण्याचा अंदाज आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

सोयाबीन दरात नरमाई

1. देशातील बाजारात आज सोयाबीन दर क्विंटलमागे २०० रुपयाने तुटले होते. प्लांट्सच्या दरातही आज २०० ते २५० रुपयांची घसरण झाली होती. देशातील सोयाबीनचा सरासरी दर आज ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या दरात जवळपास एक टक्क्यांनी घट झाली होती. त्याचे पडसाद देशातही उमटले. मात्र देशातील सोयाबीनचा बाजार किमाल ५ हजार तर कमाल ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

कापसाचे दर स्थिर

2. देशातील कापसाचा बाजार काहीसा स्थिर होता. तर कर्नाटक आणि पंजाबमध्ये कापसाच्या कमाल दराने पुन्हा एकदा १० हजार रुपयांचा टप्पा गाठला. तर इतर राज्यांतील कमाल दर ९ हजार ५०० ते ९ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर कपसाला सरासरी ८ हजार ६०० ते ९ हजार रुपये दर मिळतोय. यंदा कापसाची मागणी आणि पुरवठा बघता कापसाला सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana Rate
Colour Cotton : आले रंगीत कापसाचे वाण

उडदाची आयात घटणार

3. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात उडदाचे दर तेजीत आहेत. त्यामळं यंदा उडदाची आयात साडेतीन लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या हंगामात देशात ६ लाख ६१ हजार टन उडदाची आयात झाली होती. यंदा केंद्रानं उडदासाठी ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. तर सध्या बाजारात उडदाला ६ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.

Chana Rate
Urad Rate : उडदाचे दर तेजीतच राहणार

लिंबू दर दबावात

4. राज्यातील बाजारात सध्या लिंबूचे दर कमी झाले आहेत. राज्यातील मोठ्या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी आवक नगण्य अशीच होत आहे. मात्र थंडीमुळं लिंबाला मागणीही कमी आहे. त्यामुळं लिंबाचे दर दबावात आहेत. सध्या लिंबाला प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते २ हजार रुपये दर मिळतोय. लिंबाला ऊन वाढल्यानंतर मागणी वाढते. त्या काळात लिंबाचे दरही वाढतील, असा अंदाज लिंबू व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

हरभरा दर वाढणार का ?

5. देशात मागील वर्षभर हरभरा दर (Chana Rate) दबावात राहिले. मागील हंगामात सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव (Chana MSP) जाहीर केला होता. मात्र खुल्या बाजारात हरभरा (Chana Market) दरानं ही पातळी कधीच गाठली नाही. तर देशातील १३७ लाख टन उत्पादनापैकी सरकारने केवळ २५ लाख टन हरभरा हमीभावाने जाहीर केला. आजही देशात हरभऱ्याला सरासरी ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. म्हणजेच आजही हरभरा दर हमीभावापेक्षा ६०० रुपयांनी कमी आहे.

देशात सध्या रब्बीचा पेरा सुरु झालाय. पेरणीच्या सुरुवातीच्या काळात अनपेक्षितपणे हरभरा पेरा वाढताना दिसत आहे. चालू हंगामातील माल खरेदीसाठी सरकार गोदामांमधील हरभऱ्याची खुल्या बाजारात विक्री करत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या १५ लाख टनांपैकी नाफेडने राज्यांना ८ रुपये प्रतिकिलोच्या सवलतीने हरभरा दऊ केला आहे. अभ्यासकांच्या मते नाफेकडे १० लाख टनांचा साठा शिल्लक राहू शकतो. तर मार्च महिन्यापासून देशातील नवा हरभरा बाजारात येईल. त्यामुळं बाजारात हरभऱ्याची उपलब्ध अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं हरभरा दरात मोठ्या सुधरणेची सध्यातरी शक्यता नाही, असं जाणकारांनी सांगितलं. सध्या हरभरा बाजार ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com