Chana Sowing : दर दबावात असूनही हरभरा पेरणी वाढली

देशात मागील हंगमापासून हरभरा दर दबावात आहेत. दिवाळीच्या काळात हरभरा डाळ आणि बेसणला मागणी वाढूनही दरात सुधारणा झाली नव्हती.
Chana Crop
Chana CropAgrowon
Published on
Updated on

पुणेः देशात मागील हंगमापासून हरभरा दर (Chana Rate) दबावात आहेत. दिवाळीच्या काळात हरभरा डाळ (Chana Dal) आणि बेसणला मागणी वाढूनही दरात सुधारणा झाली नव्हती. याचा परिणाम पेरणीवर (Chana Sowing) होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात हरभरा पेरा गेल्यावर्षीपेक्षा जास्त झाला आहे.

Chana Crop
Kabuli Chana: काबुली हरभरा भाव खाणार

मागील रब्बी हंगामातील हरभरा पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचंच ठरलं. मागील आठ महिन्यांमध्ये हरभरा पिकानं खुल्या बाजारात हमीभावाचा टप्पा गाठला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना कमी दरात हरभरा विकावा लागला. गेल्या हंगामात देशात हरभऱ्याचं विक्रमी १३७ लाख टन उत्पादन झालं होतं. यापैकी नाफेडने जवळपास २७ लाख टनांची खरेदी केली होती. तर नाफेडकडे आधाचा काही हरभरा शिल्लक होता.

Chana Crop
Chana Sowing : हरभऱ्याची साडेदहा हजार हेक्टरवर पेरणी

नाफेडने साठ्यातील हरभरा मागील काही महिन्यांपासून बाजारात आणला. येणारा नवा माल खरेदी करण्यासाठी गोदामे रिकामी करावी लागत असल्याचं सराकारने यावेळी सांगितले. नाफेडने कमी दरात हरभरा बाजारात आणल्याने दरावरील दबाव कायम राहीला. पिकाचे भाव कमी राहिल्यानंतर शेतकरी त्या पिकाचा पेरा कमी करतात, असा अनुभव आहे. यंदा तुरीच्याबाबतीत हे घटलं.

सध्याचे दर

आता मागील वर्षभर हरभरा दर दबावात आहेत. शेतकऱ्यांना क्विंटलमागं जवळपास ८०० रुपये कमी कमतीने हरभरा विकावा लागला. आजही बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. सध्या दर कमी असल्यानं हरभरा पेरणीवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र आत्तापर्यंतची पेरणीची आकडेवारी पहता पेरा काहीसा अधिक झालेला दिसत आहेत. सध्या ३९ लाख ५२ हजार हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा आहे. मागीलवर्षी यात काळातील पेरा ३९ लाख १२ हजार हेक्टरवर झाला होता.

पेरणीवर परिणाम

यंदा रब्बीच्या पेरणीला परतीच्या पावसाने उशीर झाला. सध्याचे आकडे हे सुरुवातीचे आहेत. पण पेरणी पूर्ण झाल्यानंतर हरभऱ्याचं क्षेत्र कमी दिसू शकतं, असं काही अभ्यासक सांगत आहेत. पेरणी कमी होण्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी हरभरा दरात सुधारणा दिसत नाही. पुढील काही दिवस हरभरा दरात सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com