Kabuli Chana Rate : काबुली हरभरा तेजीतच राहणार

देशात सध्या काबुली हरभऱ्याचा पुरवठा कमी आहे. त्यातच मागणी वाढल्याने दरात तेजी आली आहे. सध्या देशात काबुली हरभऱ्याला १० हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.
Kabuli Chana
Kabuli ChanaAgrowon

पुणेः देशात सध्या काबुली हरभऱ्याचा पुरवठा (Chana Supply) कमी आहे. त्यातच मागणी वाढल्याने दरात (Kabuli Chana Rate) तेजी आली आहे. सध्या देशात काबुली हरभऱ्याला १० हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. मागणी आणखी वाढल्यास दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Kabuli Chana
Chana Sowing : दर दबावात असूनही हरभरा पेरणी वाढली

देशात सध्या देशी हरभरा दबावात असला तरी काबुली हरभरा मात्र चांगलाच भाव खात आहे. काबुली हरभऱ्याचं मागील हंगामात उत्पादन कमी राहीलं होतं. तसंच निर्यातीसाठी मागणी असल्याने निर्यातही मोठ्या प्रमाणात झाली. भारताच्या काबुली हरभऱ्याला मागील वर्षभरात जागतिक पातळीवर चांगलीच मगाणी होती. यामुळं देशात काबुली हरभरा पुरवठा कमी झाला. परिणामी मागील काही महिन्यांपासून काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत.

काबुली हरभरा बाजारात रोज काहीतरी घडामोडी घडतच आहेत. मागील दोन महिन्यांपासून काबुली हरभरा दर १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान फिरत आहेत. तसंच मागणी कमी जास्त झाल्यानंतर दरातही चढउतार पाहायला मिळत आहेत. मात्र काबुली हरभऱ्याचा किमान दर कमी झाली नाही. दरात सतत वाढ होत गेली. सध्या दर तेजीत असल्याने स्टाॅकिस्ट नफावसुलीसाठी बाजारात विक्री करत आहेत. मात्र दरातील वाढ ही कायम आहे.

मालाचा तुटवडा

देशातील बाजाराचा विचार करता आवक खुपच कमी आहे. त्यातही चांगल्या गुणवत्तेचा काबुली हरभरा एकदमच कमी आहे. देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये कमाल ५०० क्विंटलची आवक होत आहे. यातही चांगल्या गुणवत्ताचा माल १० टक्क्यांपेक्षाही कमी येत आहे. मात्र देशातील इतर बाजार समित्यांमधील आवक ही नगण्य अशीच आहे.

दरपातळी काय राहील?

देशात सध्या काबुली हरभऱ्याचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. देशात सध्या लग्नसमारंभाचा काळ सुरु झाला. तसेच पेरणीसाठी बियाण्याची गरज म्हणूनही काबुली हरभऱ्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर १३ हजारांवर टिकून राहू शकतात. तर मागणी जास्त वाढल्यास दर १४ हजार रुपये प्रतिक्विंटलवरही पोचतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com