
Chandrapur News: उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बघत तरुण शेतकऱ्याने एमएससी ॲग्रीचे शिक्षण घेतले. नंतर मात्र इरादा बदलला. कशाला नोकरी करायची हा स्वाभिमानी बाणा ठेवत युवा शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरली. शेतात मिरचीचे उत्पन्न घेत स्वतःचा पॅकेजिंग ब्रॅण्ड बनविला. वय झाले अन् लग्नाचा विचार सुरू झाला. त्याने अतिशय साध्या रीतीने सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. अन् लग्नात होणारा नाहक खर्च टाळत त्या रकमेतून गावातील शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ता बनवला. श्रीकांत बणपत एकुडे या युवा बळीराजाच्या या सामाजिक संवेदनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येणारे सुसा हे गाव. येथील श्रीकांत एकुडे या शेतकरी पुत्राने कृषी विषयात पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण घेतले. गलेलठ्ठ पगाराची नोकरी करण्याऐवजी आपल्या पारंपरिक शेतीला त्याने आधुनिकतेची जोड दिली. शेतात मिरचीचे उप्तन्न घेतले. त्यातून तिखट तयार करून ते बाजारात विकू लागला.
यातूनच त्याने तिखटाचा आपल्या आजीच्या ‘सिताई’ या नावाने स्वतःचा ब्रॅण्ड तयार केला. पुढे श्रीकांतचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील गोपीकिशन गरमडे यांची मुलगी अंजली हिच्याशी ठरला. विवाह महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने करण्याची त्याची अट मान्य करत मुलीकडील मंडळींनी विवाहास होकार दिला. २८ एप्रिल रोजी सुसा येथे हा विवाह पार पडला.
सामाजिक संवेदना
श्रीकांत एकुडे हा तरुण शेतकरी पुरोगामी विचारांचा आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा तो पाईक आहे. याच विचारातून श्रीकांतने आपली सामाजिक संवेदनाही जोपासली आहे. चंद्रपुरातील चिमूर तालुक्यातील भिसी या गावात श्रीकांतने ब्राईट एज या नावाची संस्था उभारली. या माध्यमातून त्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. आता तेथे ५५ विद्यार्थी निशुल्क सेवेचा लाभ घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत.
...असे केले नियोजन
लग्न तर करायचे पण पैसा खर्च करण्यात अर्थ नाही. या भावनेतून श्रीकांतने गावातील पाणंद रस्त्याची समस्या सोडविण्याचा निर्धार केला. सुसा गावात शेतात जाण्याकरिता रस्त्याचा प्रश्न गंभीर होता. अशा वेळी श्रीकांतने आपल्या स्वतःच्या पैशातून पाणंद रस्ता तयार केला. या रस्त्याने अनेक शेतकऱ्यांना आता मोठाच दिलासा मिळाला आहे.
...या भेटीचा आग्रह
विवाहात नवरा, नवरीला विविध वस्तूंची भेट दिली जाते. पण श्रीकांतने आपल्या व नवरीकडील पाहुण्यांना पुस्तके व फळझाडे भेट म्हणून देण्याबाबत सुचविले. पाहुण्यांनाही ही अफलातून कल्पना आवडली. यानुसार ९० पेक्षा जास्त फळझाडे भेट स्वरूपात देण्यात आली. ही फळझाडे श्रीकांतने आपल्या शेतात लावली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.