Farm Road : शेतरस्ते, शिव रस्ते, पाणंद रस्त्याबाबत विभागीय आयुक्तांचा शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद

Farmer online communication : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी बुधवारी (ता. १६) शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी शेतरस्ते शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबतच्या समस्या मांडल्या.
Farm Road
Farm RoadAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी बुधवारी (ता. १६) शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी शेतरस्ते शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबतच्या समस्या मांडल्या.

मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील नागरिक आपल्या शेतातील जाण्या-येण्याच्या रस्त्याबाबत अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत आयुक्तांनी शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवादाचा उपक्रम राबविला. यावेळी अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार, अपर आयुक्त के. आर. परदेशी, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

Farm Road
Farm Road : पाणंद रस्ते होणार मोकळे

विभागीय आयुक्त श्री.गावडे म्हणाले, की जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत योग्य कारवाई करावी, शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ईसारवाडी (ता. पैठण) येथील विशाल घुले यांनी पाणंद रस्त्याची समस्या बोलून दाखविली. वायगाव (ता. पैठण) येथील बबन बोबडे यांनी शेतरस्त्यासाठी प्रशासनाने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. वैजापूर तालुक्यातून विपिन काळे यांनी गावात गावनकाशा ठळक स्वरुपात लावला तर गावातील शेतरस्ते मोकळे होण्यास मदत होईल, तसेच गट मोजणी करून हद्द निश्चित करावी अशी मागणी केली. श्री.काळे यांनी मांडलेली कल्पना चांगली असल्याचे आयुक्त म्हणाले, की यामुळे शेतरस्ते, पाणंद रस्ते मोकळे होतील,

तालुका प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी तसेच नवीन रस्ते गाव नकाशात समाविष्ट करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून धोरणात्मक निर्णयासाठी राज्याच्या जमाबंदी विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असेही श्री. गावडे म्हणाले. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथून लक्ष्मण कुऱ्हाडे यांनी प्रश्न मांडला. त्यांच्यासह इतर शेतकरी बांधवांचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने सस्ती अदालतीचे आयोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार, गेवराई येथील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतरस्त्यांसंदर्भातील अडचणी मांडल्या. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी शेत रस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com