
Satara News : शासनाने शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत जिल्ह्यात गाव नकाशावरील २०६ पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून खुले करण्यात आले आहेत. याचा लाभ ३७ हजार ३२७ शेतकऱ्यांना झाला आहे. अतिक्रमित २५१ रस्त्यांपैकी ९३ टक्के रस्ते खुले करण्यात आले आहेत. उर्वरित अतिक्रमित रस्तेही लवकरच खुले करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
शंभर दिवस कृती आराखड्याच्या अंमलबजावणी जिल्ह्यात साध्य करण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती माध्यम प्रतिनिधींना देत असताना त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी आशिष बारकुल आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, की भूसंपादन ही फार मोठी जबाबदारी महसूल विभागावर आहे. जिल्ह्यात एकूण १२ भूसंपादन कार्यालये असून आतापर्यंत ६ हजार ६०० हून अधिक भूसंपादन निवाडे देण्यात आली आहे. https://bhusampadan.in हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
यावर भूसंपादन झालेल्या गावांची १ हजार २५ गावांची ५० हजार हेक्टर हून अधिक संपादीत क्षेत्राबद्दलची माहिती अपलोड करण्यात येणार आहे. विकास परवानगी तसेच जमीन वाटप करण्यात येणाऱ्या कार्यालयांना स्वतंत्र लॉगीनद्वारे संपादित अथवा संपादन प्रस्तावित असल्या बाबतची माहिती, उपलब्ध भूसंपादन ना हरकत दाखल्याची आवश्यकता संपुष्टात येणार आहे. भूसंपादन निवाड्याची संपूर्ण माहिती यावर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. यामुळे तात्काळ विकास, परवानगी, जमीन मागणी प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
मान्याचीवाडीत महिला जमिनीत सहधारक
एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंदी करण्याच्या उपक्रमांतर्गत ५३१ गावांपैकी ९२८ गावांमधील ८ हजार ९६६ नोंदी कमी करण्यात आलेल्या आहेत. याचा लाभ २५ हजार ९६७ शेतकऱ्यांना झाला आहे.
उर्वरित ७५९ गावांमधील ३ हजार ८७७ नोंदीही लवकरच कमी करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले. स्त्रियांचे हक्क सुरक्षित करण्याच्या उद्देशाने लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत मान्याचीवाडी (ता. पाटण) हे पूर्ण गाव लक्ष्मी मुक्ती योजना राबवून महिलांना जमिनीमध्ये सहधारक करणारे पहिले गाव ठरले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.