Drone Didi Scheme Maharashtra : राज्यात होणार 'ड्रोन दीदी योजने'ची अंमलबजावणी; महिला बचत गटांना ८ लाख रुपयांची मिळणार आर्थिक मदत

Maharashtra Drone Didi Scheme: महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने एप्रिल २०२४ रोजीच राज्य सरकारला पत्र पाठवलं होतं. परंतु त्यावर राज्य सरकारने कार्यवाही केली नव्हती. अखेर आता समिती स्थापन करून राज्यात योजना राबवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.
Drone Didi Scheme For Maharashtra
Drone Didi Scheme For MaharashtraAgrowon
Published on
Updated on

Drone Didi Scheme Subsidy : नमो ड्रोन दीदी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी (ता.२३) राज्य सरकारने घेतला आहे. नमो ड्रोन दीदी योजनेतून महिला बचत गटांना ८० टक्के अनुदानावर ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने एप्रिल २०२४ रोजीच राज्य सरकारला पत्र पाठवलं होतं. परंतु त्यावर राज्य सरकारने कार्यवाही केली नव्हती. अखेर आता समिती स्थापन करून राज्यात योजना राबवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे राज्यातील महिला बचत गटांना ड्रोन मिळणार आहेत.

केंद्र सरकार पुरस्कृत दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती मिशन अंतर्गत महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. द्रव खत आणि किटकनाशकांच्या फवारणीसाठी भाड्याने ड्रोन महिला चालवू शकतात. त्यातूनं आर्थिक सक्षमीकरणाला गती देता येऊ शकते, यासाठी केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे.

Drone Didi Scheme For Maharashtra
Namo Drone Didi Scheme : ग्रामीण विकास आणि महिलांच्या रोजगारासाठी सरकारची "नमो ड्रोन दीदी योजना"

या योजनेतून २०२४-२५ ते २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशातील १४ हजार ५०० निवडक महिला बचत गटांना ड्रोन देण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने १ हजार २६१ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच या योजनेतून महिला बचत गटांना ड्रोन खरेदी व इतर साहित्यासाठी ८० टक्के दराने जास्तीत जास्त ८ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य केंद्र सरकार करणार आहे. याची योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आता राज्य सरकारने राज्य स्तरीय समिती स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे.

या समितीचे अध्यक्ष राज्याचे अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/कृषी विभाग सचिव असतील. तर एकूण १० सदस्यीय समितीमध्ये विविध स्तरातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीकडून ड्रोनची सुविधा प्रभावीपणे राबवण्यासाठी लागवडीखालील क्षेत्राची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच लाभार्थी गटाची निवड. ड्रोन पायलट आणि ड्रोन सहाय्यक प्रशिक्षणासाठी सदस्याची निवड करणे आदि जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Drone Didi Scheme For Maharashtra
Drone Expert : दहावी शिकलेल्या सोमिनाथची ‘ड्रोन’वर हुकूमत

नमो ड्रोन योजनेतून महिलांना दरवर्षी किमान १ लाख रुपये मिळू शकतात. त्यामुळे महिलांचं जीवनमान सुधारू शकेल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच शेती क्षेत्रातील महिलांच्या कौशल्याचा विकास होऊन रासायनिक खत आणि किडनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करता येऊ शकेल, असाही केंद्र सरकारचा विश्वास आहे.

२०२४ मार्च महिन्यात या योजनेतून १ हजार ड्रोनचं महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाटप करण्यात आलं आहे. दरम्यान, देशातील ३ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारनं ठेवलं आहे. त्याचा एक भाग म्हणजे नमो दीदी ड्रोन योजना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com