Fish Farming : महिला बचत गटांना आता मत्स्य व्यवसायात संधी

Fisheries Business : जिल्हा परिषद मालकीच्या २१ पाझर तलाव मत्स्य व्यवसायासाठी ‘उमेद’अंतर्गत असणाऱ्या महिला बचत गटांना चालविण्यास देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
Fish Farming
Fish Farming Agrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्हा परिषद मालकीच्या २१ पाझर तलाव मत्स्य व्यवसायासाठी ‘उमेद’अंतर्गत असणाऱ्या महिला बचत गटांना चालविण्यास देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महिलांना सर्वच क्षेत्रातील व्यवसायात सहभागी करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्याच्या हेतून जिल्हा परिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

ग्रामीण भागात अलीकडच्या काळात महिलांनी असंख्य अडथळे तोडून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा ठसा उमटवून व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय बदल घडवून आणले आहेत. महिलांनी व्यवसायाच्या स्पर्धात्मक जगात स्वतःचा मार्ग तयार केला आहे.

Fish Farming
Paddy Fish Farming : भातशेतीत मत्स्यशेती करण्याचे फायदे

या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी व उद्योग व्यवसायात आर्थिक उन्नती करण्यासाठी जिल्हा परिषदेने महिलांना प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. यासाठी उमेदअंतर्गत असणाऱ्या नोंदणीकृत बचत गटांना जिल्ह्यातील पाझर तलावांमध्ये मत्स्य व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिलांसाठी विविध उद्योग आणि व्यवसाय जेणेकरून महिला आपल्या कुटुंबाच्या विकासाला हातभार लावू शकणार आहेत. दरम्यान, पाझर तलावांसाठी बचत गटांच्या महिलांची कागदपत्रे तपासून पात्र ठरलेल्या बचत गटांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

Fish Farming
Fish Farming : शेततळ्यातील मत्स्यपालनास संधी

मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

महिला बचत गटांना पाच वर्षांसाठी ठेक्याने हे पाझर तलाव देण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरूवारी (ता. २८) सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात लिलाव घेण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदअंतर्गत बचत गटांच्या मूळ कागदपत्रांसह प्रमाणपत्र, बचत गट सदस्यांनी यादी, बचत गट अध्यक्ष व सचिवांचे आधारकार्ड घेऊन येण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद मालकीच्या २१ पाझर तलाव मत्स्य व्यवसायासाठी ‘उमेद’अंतर्गत असणाऱ्या महिला बचत गटांना चालविण्यास दिले जाणार आहेत. त्यासाठी नोंदणीकृत महिला बचत गट आवश्यक असून, जिल्हा परिषदेच्या वतीने लिलाव प्रक्रिया होणार आहे.
- अरुण दिलपाक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com