Roshan Talape
ग्रामीण भागातील महिलांना ड्रोन चालवण्याच्या या योजनेला ‘नमो ड्रोन दीदी योजना’ असे नाव दिलं आहे.
'नमो ड्रोन दीदी' ही ग्रामीण महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देणारी योजना आहे. यात ड्रोनचा वापर हा शेतीसाठी, जमीन मोजणी आणि विकासकामांसाठी करतात.
या योजनेत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना रोजगाराच्या माध्यमातून पैसे कमावण्याची एक संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
ड्रोनच्या मदतीने खते आणि कीटकनाशकांची फवारणी सोप्या पद्धतीने लवकर होते. त्यामुळे वेळ वाचतो आणि उत्पादन वाढण्यास मदत मिळते.
ड्रोनचा वापर जमिनीची मोजणी करण्यासाठी तसेच त्याच जमिनीचे सोपे व अचूक नकाशे तयार करण्यासाठी होतो. यामुळे शेतकऱ्यांना आणि सरकारी यंत्रणांना जमिनीची माहिती योग्य आणि व्यवस्थित मिळते.
ड्रोनचा उपयोग पाणीपुरवठा, रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी होतो. यामुळे अशा कामांची प्रगती जलद गतीने तपासता येते आणि कामाचा दर्जा टिकवण्यास मदत होते.
नमो ड्रोन दीदी योजनेमुळे शेतीचे उत्पादन वाढण्याबरोबरच वेळही वाचतो आणि महिलांना काम मिळते.
या योजनेमुळे महिलांना नवे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळते आणि ग्रामीण भागाचा वेगाने विकास होतो.