Vermicompost Mistakes: गांडूळ खत बनवताना शेतकरी साधारणपणे कोणत्या चूका करतात?

Gandul khat Banavtanachya Chuka: खरिपाच्या दृष्टीने अनेक शेतकरी गांडूळ खत बनवण्याच्या तयारीला लागलेले असतात. परंतु ते योग्य पद्धतीने न केल्यास खताची प्रत खराब होते, गांडूळांची संख्या कमी होते आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
Mistakes in vermicomposting process
Mistakes in vermicomposting processAgrowon
Published on
Updated on

Vermicompost Bed Management: खरिपाच्या दृष्टीने अनेक शेतकरी गांडूळ खत बनवण्याच्या तयारीला लागलेले असतात. परंतु ते योग्य पद्धतीने न केल्यास खताची प्रत खराब होते, गांडूळांची संख्या कमी होते आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे या चुका टाळणे आवश्यक आहे. ही माहिती कृषि विज्ञान केंद्र धुळे येथील मृदा विज्ञानाचे विषय विशेषज्ञ डॉ. अतिश पाटील यांनी दिली आहे.

गांडूळाची चुकीची जात निवडणे – गांडूळ खतासाठी आयसेनिया फोएटिडा ही जात उत्तम मानली जाते. ही जात वरच्या थरात राहून खाते आणि तिचे जीवनचक्र जलद पूर्ण होते.

जागेची निवड आणि तापमान – बेड चिखल किंवा दलदलीत नसावा. थेट उन्हामुळे तापमान वाढते व माती कोरडी होते, त्यामुळे सावलीत व निचरा होणारी जागा निवडावी.

Mistakes in vermicomposting process
Vermicompost Method: गांडूळ खत निर्मितीसाठी शासनाकडून अनुदान, सोप्या भाषेत खत निर्मितीचे तंत्र

पाण्याचे अयोग्य नियोजन – कमी पाणी असल्यास गांडूळ सुकतात, तर जास्त पाणी असल्यास गुदमरून मरतात. त्यामुळे बेडमध्ये वाफसा स्थिती ठेवणे आवश्यक आहे.

टाकीची बांधणी – सिमेंट टाकी पूर्ण प्लास्टर केल्यास हवा खेळती राहत नाही व तापमान वाढते. त्यामुळे कच्चे बांधकाम किंवा योग्य बेड वापरावा.

बेडच्या बाजूला अस्वच्छता – तण व कचरा असल्यास मुंग्या, उंदीर, साप त्रास देतात. त्यामुळे गांडूळांना इजा होऊ शकते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवून निंबोळी पेंड किंवा कडूलिंबाचा पाला वापरावी. रासायनिक कीटकनाशक टाळावे.

गांडूळांची संख्या – एका बेडसाठी १ ते २ किलो गांडूळ वापरणे योग्य आहे, अन्यथा प्रक्रिया मंदावते.

सेंद्रिय पदार्थ अर्धवट कुजलेले नसणे – पूर्ण किंवा अजिबात न कुजलेले पदार्थ वापरण्याऐवजी अर्धवट कुजलेले पदार्थ वापरावेत.

ताजं शेण वापरणे – ताज्या शेणामुळे उष्णता वाढून गांडूळ मरतात. त्यामुळे १५–२० दिवस जुने व कुजलेले शेण वापरावे.

चुकीचे पदार्थ टाकणे – लिंबूवर्गीय फळे, कांदा, लसूण, मासे, दुग्धजन्य पदार्थ तसेच प्लास्टिक, काच, धातू बेडमध्ये टाकल्यास खताची प्रत खराब होते.

खत काढताना पूर्व नियोजन नसणे – खत काढताना बाजूला दोन बेड तयार ठेवावेत, जेणेकरून गांडूळ पुन्हा वापरता येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com